कर्नाटकातील (Karnataka) दक्षिण कन्नड जिल्ह्यात असलेल्या श्री दुर्गा परमेश्वरी मंदिरात (Sri Durgaparameshwari) आगीसोबत धोकादायक खेळ खेळला जातो. या खेळाला अग्नी खेळी किंवा थुथेधारा म्हणून ओळखले जाते. आणि हि त्या भागातील मोठी धार्मीक परंपरा आहे. दुर्गा मंदिर हे कटील मंदिर या नावाने देखील ओळखले जाते ते मंगळुरूपासून 28 किमी अंतरावर आहे. कटील (Kateel) हा दोन शब्दांपासून बनलेला शब्द आहे.
कटी म्हणजे केंद्र आणि इला म्हणजे स्थान. तेव्हा कटील म्हणजे नंदिनी नदीच्या मधोमध असलेली जागा. कर्नाटकातील कटील येथील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिरात काल देवी दुर्गाला जागृत करण्यासाठी 'थुथेधारा' (Thoothedhara) किंवा 'अग्नी खेळी' (Agni Kheli) खेळली गेली. या अग्निविधीचा आणि परंपरेचा भाग म्हणून भाविकांनी एकमेकांवर आग फेकली.
कटील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिरातील वार्षिक उत्सवाचा एक भाग म्हणून देवतेला प्रसन्न करण्यासाठी अत्तूर आणि कोडत्तूर या दोन ग्रामपंचायतीतील ग्रामस्थ एकमेकांवर आग फेकतात. या परंपरेचे सुद्दा एक वैशिष्टय आहे.'अग्नी केली' मध्ये एखादी व्यक्ती फक्त पाच वेळा प्रतिस्पर्ध्यावर मारा करू शकते आणि सहाव्या वेळी तळहाताचा भाग टाकून द्यावा लागतो
ज्वलंत आगीच्या काठ्या तळहाताचे प्रतिस्पर्ध्यावर फेकले जातात आणि नंतरचे उचलून विरुद्ध गटावर फेकले जातात, या खेळामध्ये वैयक्तिक कुठलेही नाते संबध नसते. नागरिक एकत्र येवून या क्षणाचा आनंद घेतात. ब्रह्मरतोस्तव आणि देवतेच्या अवभृतस्नानानंतर खेळला जातो. हा सगळा खेळ फक्त 15 मिनिटे चालतो आणि थांबल्यानंतर गावकरी मंदिरात जातात
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.