कडाक्याची थंडी

 

Dainik Gomantak 

देश

Weather Update: देशात पुढील दोन दिवस कडाक्याची थंडी

शहरात आतापर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: देशातील अनेक राज्यांमध्ये (states) पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीपासून (cold) दिलासा मिळण्याची आशा नाही. भारतातील उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये थंडीच्या लाटेचा कहर 21 डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे.

यामध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशातील काही भागांचा समावेश आहे. भारतीय हवामानशास्त्राच्या (IMD) शास्त्रज्ञाने ही माहिती दिली आहे. त्याच वेळी, देशाची राजधानी दिल्लीतील (Delhi) लोधी रोडवर रविवारी सर्वात कमी तापमान 3.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

भारतीय हवामान खात्याच्या (IMD) म्हणण्यानुसार, पुढील दोन दिवस देशाच्या उत्तर-पश्चिमी राज्यांमध्ये कडाक्याची थंडी कायम राहणार असून त्यानंतरच दिलासा मिळणे अपेक्षित आहे. त्याच वेळी, पुढील दोन दिवस उत्तराखंडच्या विविध भागात दाट धुके असेल तर पंजाब आणि हरियाणामध्ये (Punjab and Haryana) 23 आणि 24 डिसेंबरपर्यंत कडाक्याच्या थंडीसह धुके असेल.

पूर्व आणि पश्चिम राजस्थान, पूर्व आणि पश्चिम मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात थंडीची (Cold) लाट कायम राहील, असा अंदाज IMD ने वर्तवला आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. देशाच्या मैदरी भागात सर्वात कमी तापमान राजस्थानमधील चुरू येथे उणे 2.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर सीकर (-2.5) आणि अमृतसर (-0.5) अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राजधानीत तापमान 5 अंशांवर

राजधानी दिल्लीत शनिवारी किमान तापमान 5 अंशांवर पोहोचले होते. हे आतापर्यंतच्या हंगामातील नीचांकी तापमान होते. दुसरीकडे कडाक्याची थंडी आणि थंडीच्या लाटेमुळे रात्र निवारागृहांमध्ये बेघर होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. हवामान खात्याने दिल्लीत थंड लाटेचा इशारा दिला आहे तसेच रविवार आणि सोमवारसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

बर्फाची चादर

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) थंडीचा कहर सुरूच असून येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. श्रीनगरमध्ये 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

शहरात आतापर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग रिसॉर्टमध्ये उणे 7.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वार्षिक अमरनाथ यात्रेचा बेस कॅम्प असलेल्या पहलगाममधील तापमान उणे 8.7 अंश सेल्सिअस होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Valpoi Road Issue: होंडा येथील रस्त्यांची दुरवस्था, गावकरवाडा ते पोलिस स्टेशनपर्यंत दैना; नवरात्रीपूर्वी डागडुजी करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Live News: व्लॉगर अक्षय वशिष्ठला जामीन मंजूर!

Goa Crime: फार्म हाउसमधील रोख, दुचाकी घेऊन काढला होता पळ, 6 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक

Shirgaon Stampede: 'शिरगाव' दोषींवर कारवाई होणार? गृह खात्याकडून फाईल सरकारकडे, काय आहे चौकशी समितीचे म्हणणे?

Horoscope: भाग्याची साथ! मेष-मिथुन राशींसह 'या' 5 राशींचा दिवस मंगलकारी; करिअर, नोकरी व व्यवसायात मिळेल सकारात्मक फळ

SCROLL FOR NEXT