Chief Justice NV Ramana Dainik Gomantak
देश

'न्यायाधीशांविरुद्ध Social Media वर कम्पेन', सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता

Chief Justice NV Ramana: देशाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमना यांनी न्यायव्यवस्थेसमोरील आव्हाने आणि प्रसारमाध्यमासंबंधी भाष्य करताना न्यायव्यवस्थेच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली.

दैनिक गोमन्तक

Judiciary: देशाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी न्यायव्यवस्थेसमोरील आव्हाने आणि प्रसारमाध्यमासंबंधी भाष्य करताना न्यायव्यवस्थेच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सरन्यायाधीश म्हणाले, 'न्यायाधीशांचे जीवन सोपे असते, परंतु ते जीवनातील अनेक आनंद गमावतात. कधीकधी महत्त्वाच्या कौटुंबिक कार्यक्रमालाही मुकावे लागते.' नुपूर शर्मा यांच्यावरील खटल्यासंबंधी CJI म्हणाले की, 'न्यायाधीशांविरोधात सोशल मीडियावर मोहीम सुरु आहे.'

दरम्यान, सरन्यायाधीश एनव्ही रमणा (Chief Justice NV Ramana) शनिवारी रांची येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ स्टडी अँड रिसर्च इन लॉ कॉलेजमध्ये 'न्यायाधीशांचा न्याय' या विषयावर एका कार्यक्रमात बोलत होते. CJI म्हणाले की, 'आज इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया लोकशाहीला (Democracy) हानी पोहोचवत आहे.' मीडिया (Media) कोणत्याही प्रकारच्या तथ्यांची पडताळणी न करता 'कांगारु कोर्ट' भरवत असल्याचे देखील सरन्यायाधीशांनी म्हटले.

न्यायाधीशांविरुद्ध मोहीम

नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी मुहम्मद पैंगबर यांच्यावर केलेल्या टीकेच्या निकालावर प्रतिक्रिया देताना CJI म्हणाले की, सोशल मीडियावर न्यायाधीशांविरोधात मोहीम सुरु आहे. न्यायाधीश तात्काळ प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत, परंतु ही त्यांची कमजोरी किंवा असहायता आहे असे समजू नये.'

कधीकधी मला रात्री झोपही येत नाही : सरन्यायाधीश

दर आठवड्याला 100 पेक्षा जास्त प्रकरणांची तयारी करणे सोपे नाही. CJI रमणा म्हणाले की, 'निर्णय लिहिताना स्वतंत्र संशोधन करणे आवश्यक असते. कोर्ट उघडल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसाची तयारी सुरु होते. आम्ही साप्ताहिक सुट्टी आणि न्यायालयीन सुट्ट्यांमध्येही निर्णयांवर संशोधन करण्याचे काम करतो. निर्णयांचा पुनर्विचार करताना कधी-कधी झोपही लागत नाही.'

न्यायाधीशांवरील शारीरिक हल्ल्यांच्या संख्येत वाढ

सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, 'जर आपल्याला लोकशाही हवी असेल तर आपल्याला न्यायव्यवस्थेला मजबूत करावे लागेल. त्याचबरोबर न्यायाधीशांनाही सक्षम करावे लागेल. अलिकडे, न्यायाधीशांवरील शारीरिक हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत.'

प्रसारमाध्यमे 'कांगारु कोर्ट' चालवत आहेत

'मी प्रसारमाध्यमांना, विशेषतः इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाने (Social Media) जबाबदारीने वागण्याचे आवाहन करतो. जसे आम्ही आहोत तसे तुम्हीही महत्त्वाचे स्टेकहोल्डर आहात. प्रसारमाध्यमे एखाद्या घटनेची शहानिशा न करता 'कांगारु कोर्ट' भरवू लागले आहेत,' असेही सरन्यायाधीश म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT