UP त बॉलिवूड, फिल्मसिटी उभारण्यासाठी ग्लोबल टेंडर; 1000 एकरवर होणार बांधकाम

Chief Minister Yogi Adityanath: उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी बनवण्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
Chief Minister Yogi Adityanath
Chief Minister Yogi AdityanathDainik Gomantak

Film City In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशात फिल्म सिटी बनवण्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार, आता राज्यात फिल्मसिटी उभारण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या फिल्मसिटीबाबत आता राजकीय कसरती सुरु झाल्या आहेत.

दरम्यान, नोएडा येथील सेक्टर-21, गौतम बुद्ध नगर, यूपी येथे फिल्मसिटी उभारण्यात येणार आहे. आता 1000 एकरात उभारल्या जाणाऱ्या या फिल्मसिटीबाबत जागतिक निविदा काढण्याची चर्चा रंगली आहे. लखनौमध्ये (Lucknow) येत्या काही दिवसांत औद्योगिक विकास प्राधिकरणाची बैठक होणार आहे. या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर होऊ शकतो, असे मानले जात आहे.

Chief Minister Yogi Adityanath
अलाहाबाद HC चा मोठा निर्णय, लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेला ठोठावला पाच हजारांचा दंड

ऑफर काय आहे?

लखनौमध्ये होणाऱ्या औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या बैठकीत फिल्मसिटी तयार करण्यासाठी निविदा प्रस्तावित करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यातील या प्रस्तावित फिल्म सिटीसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. दहा हजार कोटींचा प्रोजेक्ट असल्याचे सांगितले जात आहे.

Chief Minister Yogi Adityanath
हनुमान चालीसा वाचली म्हणून विद्यार्थ्यांना MP सरकारने ठोठावला 5 हजारांचा दंड

दुसरीकडे, या फिल्मसिटीचे बांधकाम तीन टप्प्यात उभारण्यात येणार आहे. तर प्रकल्पात (Project) या फिल्मसिटीचा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात फिल्म स्टुडिओ, ओपन एरिया, अ‍ॅम्युझमेंट पार्क, व्हिला आदी तयार करण्याची चर्चा आहे. पहिल्या टप्प्यातच चित्रपटाच्या (Movie) शूटिंगशी संबंधित 80 टक्के भाग तयार केला जाईल, असे मानले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com