Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

"गुजरातमधील सर्व जागा लढवणार...": Delhi CM अरविंद केजरीवाल

दैनिक गोमन्तक

Delhi CM Arvind Kejriwal: यंदा गुजरात, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकामध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. सर्वच पक्षांनी आत्तापासूनच जय्यत तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृह राज्यात (गुजरात) आम आदमी पक्षाने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने गुजरातचा दौरा करत आहेत.

दरम्यान, गुजरातमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, 'दोन महिने बाकी आहेत, भाजप सत्तेतून जात आहे, आणि आम आदमी पक्षाचे नवे सरकार स्थापन होत आहे. गुजरातमधील सर्व जागा आम्ही लढवणार आहोत. गेल्या अनेक महिन्यांपासून मी गुजरातमध्ये फिरतोय, लोकांना भेटतोय. वकील, ऑटोचालक, शेतकरी, व्यापारी यांना भेटल्यानंतर मला समजले आहे की, गुजरातमध्ये भ्रष्टाचाराचे पेव फुटले आहे. कोणत्याही सरकारी खात्यात काम करायचे झाल्यास पैसे द्यावे लागतात. सरकारी पातळीवर मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. कोणी विरोधात बोलायला सुरुवात केल्यास त्यास जीवे मारण्याची धमकी दिली जाते. व्यापाऱ्यांना, उद्योगपतींना धाड टाकून तुमचा व्यवसाय बंद करुन टाकू, अशा धमक्या सातत्याने दिल्या जात आहेत. राज्यात भ्रष्टाचार आणि गुंडगिरीचं प्रमाण वाढलं आहे, परंतु आज आम्ही हमी देतोय की, गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) सरकार आल्यास भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त शासन दिले जाईल.'

केजरीवाल पुढे म्हणाले की, 'आमचा कोणीही मुख्यमंत्री, मंत्री, आमदार असो, आमचा कोणताही खासदार असो, इतर कोणत्याही पक्षाचा आमदार असो, कोणालाही भ्रष्टाचार करु देणार नाही. भ्रष्टाचार केल्यास तुरुंगात पाठवू. यापुढे आता गुजरातच्या जनतेचा पैसा गुजरातच्या (Gujarat) विकासावर खर्च केला जाईल.'

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) पुढे असेही म्हणाले की, 'जर मी गुजरातच्या जनतेला मोफत वीज देण्याबद्दल बोलत असेल तर भाजप विरोध का करत आहे? मी शाळा रुग्णालय दुरुस्त करण्याबद्दल बोलत असेल, तर भाजपला काय अडचण आहे, विरोध का करत आहेत. दिल्लीतील जनतेला जशी मोफत वीज मिळाली, तशीच पंजाबच्या लोकांनाही ती मिळाली. आता गुजरातच्या लोकांनाही ती मोफत मिळाली पाहिजे. गुजरातच्या शाळा आणि रुग्णालयेही ठीक झाली पाहिजेत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics:...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपचे डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान

'विवाहित मुस्लिम पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार नाही': अलाहाबाद हायकोर्ट

Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

Fireworks Factory Big Explosion: शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

महिलांना ‘स्वीटी’ आणि ‘बेबी’ म्हणणे लैंगिक टिप्पणी आहे का? वाचा हायकोर्टाने काय दिला निर्णय

SCROLL FOR NEXT