Watching Porn Privately Is Not Crime Dainik Gomantak
देश

"एकांतात पॉर्न पाहणे गुन्हा नाही, ही वैयक्तिक आवडीची बाब," खासगी गोष्टीत हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

न्यायालयाने असे सांगितले की एकांतात अश्लील फोटो किंवा पोर्नोग्राफी पाहणे हा कायद्यानुसार गुन्हा असू शकत नाही. आयपीसी मध्ये फक्त अश्लील पुस्तके, वस्तूंची विक्री आणि वितरणास शिक्षेची तरतूद आहे.

Ashutosh Masgaunde

Watching Pornography Obscene photographs or videos in private is not a Crime, Says Kerala High Court:

एखाद्याने अश्लील छायाचित्रे किंवा व्हिडीओ इतरांना न दाखवता एकांतात पाहणे हा कायद्यानुसार गुन्हा नाही कारण ही वैयक्तिक आवडीची बाब आहे, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

असे कृत्य गुन्हा म्हणून घोषित करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेमध्ये घुसखोरी करणे आणि त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडीमध्ये हस्तक्षेप करणे होय, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

मला असे कळते की, एखाद्या व्यक्तीने त्याच्या वैयक्तिक मर्यादेत अश्लील फोटो किंव्हा व्हिडिओ पाहणे हा आयपीसी अंतर्गत गुन्हा नाही. मात्र, जर आरोपी कोणतेही अश्लील व्हिडिओ किंवा फोटो प्रसारित करण्याचा किंवा वितरित करण्याचा किंवा सार्वजनिकरित्या प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो आयपीसी कलम 292 अंतर्गत गुन्हा ठरेल.
न्यायमूर्ती पी व्ही कुन्हीकृष्णन

न्यायमूर्ती पी व्ही कुन्हीकृष्णन यांनी हा निर्णय 33 वर्षीय पुरुषाविरुद्धच्या अश्लीलतेचा खटला रद्द करताना दिला आहे, ज्याला 2016 मध्ये रस्त्याच्या कडेला त्याच्या मोबाइल फोनवर अश्लील व्हिडिओ पाहताना पोलिसांनी पकडला होता.

या प्रकरणी एफआयआर आणि त्याच्याविरुद्धची न्यायालयीन कार्यवाही रद्द करण्याच्या आरोपीच्या याचिकेवर हा निर्णय आला. न्यायालयाने म्हटले की पोर्नोग्राफी शतकानुशतके प्रचलित आहे आणि नवीन डिजिटल युगाने ते अधिक सुलभ केले आहे.

'शतकांपासून पॉर्न प्रचलित'

याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, 'पोर्नोग्राफी' शतकानुशतके प्रचलित आहे आणि नवीन डिजिटल युगाने लहान मुलांसाठीही त्याचा एक्सेस अधिक सुलभ केला आहे. न्यायालयाने म्हटले की, 'या प्रकरणात प्रश्न असा होता की, एखाद्या व्यक्तीने खासगीत अश्लील व्हिडिओ इतर कोणालाही न दाखवता पाहिला तर तो गुन्हा आहे का?'

'गोपनीयतेत घुसखोरी'

उच्च न्यायालयाने म्हटले, 'हे गुन्ह्याच्या श्रेणीत येते, असे न्यायालय जाहीर करू शकत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे ही प्रत्येकाची वैयक्तिक आवड निवड आहे आणि त्यात हस्तक्षेप करणे म्हणजे त्याच्या गोपनीयतेवर आक्रमण करण्यासारखे आहे.'' असे नमूद करत न्यायमूर्ती पीव्ही कुन्हीकृष्णन यांनी 33 वर्षीय व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 292 अंतर्गत अश्लीलतेचा गुन्हा रद्द केला.

न्यायमूर्ती पीव्ही कुन्हीकृष्णन पुढे म्हणाले की मुलांचे पालनपोषण घरचे अन्न चारत आणि त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.

"मुलांना त्यांच्या फावल्या वेळात क्रिकेट किंवा फुटबॉल किंवा त्यांना आवडणारे इतर खेळ खेळू द्या. भविष्यात आपल्या देशाच्या आशेचा किरण बनलेल्या निरोगी तरुण पिढीसाठी ते आवश्यक आहे,” असे या निकालात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Gen Z Protest: नेपाळमध्ये हिंसाचार शिगेला! माजी पंतप्रधान देउबा आणि पत्नीला आंदोलकांची मारहाण; रक्तबंबाळ अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल!

Akshay Kumar Property: मॉरिशस, कॅनडा आणि गोव्यात आलिशान व्हिला... 2,500 कोटींची संपत्ती आणि गाड्यांचा ताफा; 'अशी' आहे बॉलीवूडच्या 'खिलाडी'ची जीवनशैली

आमका आयआयटी नाका! कोडार येथे प्रकल्प नको म्हणून ग्रामस्थ एकवटले Watch Video

IIT Goa: 'गोव्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याची सवय लागलीय...'; प्रस्तावित आयआयटीवरुन मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा विरोधकांवर प्रहार

Gold Price: सोन्याच्या दरांनी मोडले सगळे रेकॉर्ड! एकाच दिवसात तब्बल 'इतक्या' हजारांची वाढ, 10 ग्रॅम सोन्याचा भाव पुन्हा 1 लाख पार

SCROLL FOR NEXT