Yogi Adityanath warning video Dainik Gomantak
देश

Watch Video: 'मौलाना विसरले सत्तेत कोण आहे, असा धडा शिकवू की तुमची येणारी पिढी दंगा करणे विसरेल'; योगींचा इशारा

CM Yogi Adityanath Video: सणासुदीच्या काळात दंगा केला जात आहे, अशा प्रकारे दंगा करणाऱ्यांना आता चांगलाच धडा शिकवला जाईल, असा इशारा योगींनी दिला.

Pramod Yadav

उत्तर प्रदेश: बरेली येथे झालेल्या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली असून, दंगा घडवणाऱ्यांना सक्त इशारा दिला आहे. एका सार्वजनिक ठिकाणी बोलताना योगींनी अशा घटनांविरोधात कायद्याने कठोर कारवाईचा इशारा दिलाय. ‘सत्तेत कोण आहे याचा मौलानाला विसर पडलाय, असा धडा शिकवू की तुमची पिढी दंगा करणे विसरून जाईल’, असे मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले.

विकसित उत्तरप्रदेश व्हिजन २०४७ या कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थितांना संबोधित करत होते. “त्यांना सिस्टिम ब्लॉक करायचीय हा काय प्रकार आहे? २०१७ पूर्वी असेच होत होते पण २०१७ नंतर आम्ही कर्फ्यू लावला नाही, त्यांना ज्याप्रकारची भाषा समजते त्याच भाषेत त्यांना उत्तर देण्यात आले शिवाय शिक्षाही देण्यात आली”, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

"सणासुदीच्या काळात दंगा केला जात आहे, अशा प्रकारे दंगा करणाऱ्यांना आता चांगलाच धडा शिकवला जाईल. सात पिढ्या लक्षात ठेवतील असा धडा शिकवला जाईल, काही लोकांच्या वाईट सवई कधी –कधी जात नाहीत, यासाठी कायद्याने त्यांची डेंटींग – पेंटींग करावी लागते, जेणेकरुन त्यांच्या वाईट सवयी सुटतील", असे मुख्यमंत्री योगी म्हणाले.

"बरेलीत जो प्रकार झाला तो सर्वांनी बघितला. सत्तेत कोण आहे हे तो मौलाना विसरला. त्याला वाटलं धमकी देऊन आम्ही जबरदस्ती रस्ता बंद करु पण, आम्ही म्हटले रस्ता जाम होणार नाही, कर्फ्यू लागणार नाही, सगळ्यांना असा धडा शिकवू की तुमची येणारी पिढी दंगा करणे विसरून जाईल", असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला.

शुक्रवारी नमाज झाल्यानंतर बरेलीत मोठा गोंधळ झाला होता. मौलाना तौकीर रजा यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने लोक एकत्र आले व त्यांनी मोर्चा काढला. यावेळी पोलिसांवर दगडफेक देखील झाली. पोलिसांनी जमावाला थोपविण्यासाठी अश्रुधुराच्या कांड्या आणि लाठीचार्ज केला.  पोलिसांनी याप्रकरणी मौलाना तौकीर रजा याच्यासह इतरांना अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT