दोडामार्ग घटनेमागे मंत्री राणे सूत्रधार, त्यांना अटक करा; सिंधुदुर्गात हिंदू–मुस्लिम तणाव वाढविण्यास तेच जबाबदार - मविआ

Dodamarg Sindhudurg: जिल्ह्यात हिंदू – मुस्लिम तणाव निर्माण होण्यासाठी त्यांची प्रक्षोभक भाषणं कारणीभूत आहेत, असा आरोप उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष बाबुराव धुरी यांनी केला.
Hindu Muslim tensions Sindhudurg
Minister Nitesh Rane controversyDainik Gomantak
Published on
Updated on

सिंधुदुर्ग: गोमांस वाहतुकीच्या संशयावरून दोडामार्ग येथे झालेल्या कार जाळपोळ आणि मारहाण प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. या घटनेमागे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे सूत्रधार असून, त्यांना अटक करण्याची मागणी आता महाविकास आघाडीने केली आहे. शांतताप्रिय सिंधुदुर्गमध्ये हिंदू – मुस्लिम तणाव वाढविण्यास तेच जबाबदार असल्याचा आरोपही आघाडीच्या नेत्यांनी केला.

दोडामार्ग येथे घडलेल्या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दोडामार्ग येथे पत्रकार परिषद घेत घटनेचा निषेध करत भूमिका स्पष्ट केली. यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष बाबुराव धुरी, तालुका प्रमुख संजय गवस, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर यांच्यासह इतर राजकीय नेते उपस्थित होते.

मंत्री नितेश राणे यांना या घटनेमागील सूत्रधार म्हणून अटक करावी, अशी मागणी नेत्यांनी यावेळी केली.

Hindu Muslim tensions Sindhudurg
उद्धवस्त रनवे आणि जळालेल्या इमारती विजय वाटत असेल तर त्यांनी त्याचा आनंद घ्यावा; 3 मिनिटांत भारताने पाकच्या खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला Watch Video

राजकीय स्वार्थासाठी नितेश राणे हिंदुत्वाचा डंका वाजवत फिरतात. जिल्ह्यात हिंदू – मुस्लिम तणाव निर्माण होण्यासाठी त्यांची प्रक्षोभक भाषणं कारणीभूत आहेत, असा आरोप यावेळी उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष बाबुराव धुरी यांनी केला.

घटलेल्या हिंसाचाराच्या घटनेमागेही त्यांचाच हात असल्याचा आरोप धुरी यांनी यावेळी केला. राणे तरुणांना भडकावण्याचे काम करतायेत, असा आरोप त्यांनी केला.

राणे कुटुंबावर दादागिराचा आरोप करणारे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर मौन का आहेत? असा सवालही धुरी यांनी यावेळी उपस्थित केला. हिंसाचाराच्या या घटनेवर केसरकरांनी भूमिका स्पष्ट करावी, असेही धुरी म्हणाले.

दरम्यान, दोडामार्ग येथील जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. यामध्ये नगराध्यक्षांसह भाजप मंडल अध्यक्षांचा देखील समावेश आहे.

Hindu Muslim tensions Sindhudurg
Mandrem: मांद्रेतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण! वाहनचालकांची होतेय कसरत; डिसेंबरनंतर होणार हॉटमिक्स डांबरीकरण

तिलारी येथील पाताडेश्वर येथे गोमांस वाहतुकीच्या संशयावरुन निजामुद्दीन मोहम्मद सय्यद या तरुणाला मारहाण करण्यास त्याची कार पेट्रोल टाकून जाळण्यात आली. ५० ते ६० लोकांच्या जमावाने पोलिसांचे वाहन देखील अडवून कारवाईत अडथळा निर्माण केला.

दुसरीकडे पालकमंत्री नितेश राणे यांनी हिंदुत्वासाठी झटणाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, वक्तव्य केले आहे. मुलांना कोणी हात लावणार नाही, आम्ही यातून गेलेलो आहोत, असेही राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com