Vishwa Hindu Mahasangh has prepared 50 kg Bulldozer cake on birthday of Yogi Adityanath Twitter
देश

50 किलोच्या केकवर बनवला बुलडोझर, असा काहीसा साजरा झाला CM योगींचा वाढदिवस

मुख्यमंत्री योगींचे कार्यकर्ते CM योगींच्या पुतळ्याला लाडू खाऊ घालण्याच्या प्रयत्नात दिसले.

दैनिक गोमन्तक

हिंदू युवा वाहिनी आणि विश्व हिंदू महासंघ (Vishwa Hindu Mahasangh) यांच्या वतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये योगींचा (Yogi Adityanath) पुतळा बसवण्यात आला. यावेळी 50 किलोचा भोग तयार करण्यात आला, 50 दिवे प्रज्वलित करण्यात आले आणि योगी वृक्षाचेही रोपण करण्यात आले. योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसानिमित्त विश्व हिंदू महासंघाने 50 किलोचा केक तयार केला असून, त्यावर बुलडोझरचा फोटो टाकून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(CM Yogi Adityanath Birthday)

विश्व हिंदू महासंघाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष देवेंद्र सिंह म्हणाले की, बाबा जी बुलडोझरमुळे ओळखले जातात. आज सर्व राज्यांमध्ये बुलडोझरची कारवाई करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात गुंडांची राजवट संपली आहे, रस्ते चांगले झाले आहेत, राम मंदिर बांधले जात आहे. आम्ही सर्व कामाबाबत खूप आनंदी आहोत. एक दिवस ते पंतप्रधान होतील अशी आशा आहे. दुसरीकडे हिंदू युवा वाहिनी, दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष दिनेश अग्रवाल यांनी सांगितले की, योगीजींनी यावेळी उपस्थित राहावे अशी आमची इच्छा होती, आम्ही मंदिर आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांशी बोललो होतो. पण ते शक्य नसल्याने आम्ही हा पुतळा बनवला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांचा वाढदिवस त्यांचे चाहते त्यांच्या पद्धतीने साजरा करत आहेत. यावेळी कार्यकर्ते उत्साही दिसले आणि पुतळ्याला लाडू खाऊ घालण्याच्या प्रयत्नात दिसले.

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनीही दिल्या शुभेच्छा

आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने अनेकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 25 मार्च 2022 रोजी पाच वर्षांच्या कालावधीनंतर त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि पूर्ण बहुमताने दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. यावेळी ते पहिल्यांदाच गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT