अखिलेश यादव यांनी योगी सरकारच्या बजेटवर उपस्थित केले प्रश्न

गायींच्या घटत्या संख्येला योगी सरकार जबाबदार
Akhilesh Yadav
Akhilesh Yadav Dainik Gomantak
Published on
Updated on

आपल्या प्रखर वकृत्त्वाने योगी सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडणारे सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी योगी सरकारच्या बजेटवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आज ते विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलत होते.यावेळी विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी शेती, शिक्षण, आरोग्य आदी मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात गायींची संख्या कमी होत आहे. त्यामुळे दूध उत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. (Questions raised by Akhilesh Yadav on the budget of the Yogi Government)

Akhilesh Yadav
जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत वाढली, व्हिडिओ कॉलद्वारे सबमिट करा आपले प्रमाणपत्र

स्वच्छ भारत अभियानाचा संदर्भ देत ते म्हणाले की, राज्यातील प्रत्येक शहरात अस्वच्छता पसरली आहे. तसेच राज्यातील विद्यापीठांमध्ये कुलगुरूंच्या नियुक्त्या जातीच्या आधारे केल्या जात असल्याचा आरोप केला. यादव यांनी राज्यातील वीज व्यवस्थेबाबत सांगितले की, गेल्या पाच वर्षांत वीजनिर्मितीचे एकही काम झाले नाही. त्यामुळे कडक उन्हात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांनी गुंतवणुकीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि व्यवसाय सुलभतेला गुन्हा करणे सोपे म्हटले. राज्यातील वातावरण अशांत आहे, शांतता असल्याशिवाय राज्याचा विकास होणार नाही, असे विरोधी पक्षनेते म्हणाले.

आपल्या भाषणादरम्यान विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर शिक्षण, आरोग्य, वीज व्यवस्था आणि गुंतवणूक अशा अनेक मुद्द्यांवरून टीका केली. ते म्हणाले की, सरकारचा अर्थसंकल्प विभागला जाणार आहे. हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांशी विश्वासघात करणारा आहे. त्यांनी आरोग्य क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीबाबत चर्चा केली. त्यामूळे योगी सरकार यावर काय भाष्य करणार हे पाहणे महत्त्वाचे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com