Virat Kohli X Post  Dainik Gomantak
देश

Virat Kohli: 'आनंदाचा क्षण दुःखात बदलला'! विराट कोहलीची X पोस्ट; दुर्दैवी घटनेबद्दल केला शोक व्यक्त

Bengaluru RCB Stampede: भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (आरसीबी)चा स्टार फलंदाज विराट कोहलीने ४ जून रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेबद्दल पुन्हा तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

Sameer Panditrao

Virat Kohli on Bengaluru Stampede

बंगळूर : भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (आरसीबी)चा स्टार फलंदाज विराट कोहलीने ४ जून रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेबद्दल पुन्हा तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. आरसीबीने आपल्या १८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएल विजेतेपद पटकावले.

या अभूतपूर्व यशाचा आनंद साजरा करण्यासाठी तब्बल अडीच लाखांहून अधिक चाहते स्टेडियममध्ये जमले होते. मात्र, वाढलेल्या गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.

कोहलीचा संदेश

विराट कोहलीने आरसीबीच्या एक्स हँडलवरून आपली भावना व्यक्त करताना लिहिले – “अशा प्रकारच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेला कोणीही सामोरे जायला इच्छित नाही. आमच्या संघासाठी सर्वांत आनंदाचा क्षण दुर्दैवी प्रसंगात बदलला. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांसोबत आणि जखमी चाहत्यांसाठी मी प्रार्थना करतो. त्यांचे नुकसान आमच्या कहाणीचा भाग झालेला आहे. आम्ही मिळून सावधगिरी, आदर आणि जबाबदारीने पुढे जाऊ.”

अहवालात उघड त्रुटी

घटनेच्या अधिकृत तपास अहवालात म्हटले आहे की योग्य परवाने तसेच प्रचंड गर्दीमुळे ही दुर्घटना घडली. आरसीबी फ्रँचायझीकडून सोशल मीडियावर खुले निमंत्रण देण्यात आल्याने लाखो चाहते स्टेडियमकडे धावले.

पोलिसांनीही कबूल केले की इतक्या मोठ्या जनसमूहाला नियंत्रित करण्यासाठी पुरेसा फौजफाटा उपलब्ध न्हवता. तपास समितीने आरसीबी व्यवस्थापनाला या परिस्थितीसाठी जबाबदार ठरवले आहे, कारण त्यांनी मोठ्या प्रमाणात चाहत्यांना उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित केले होते.

मृतांच्या कुटुंबियांना मदत

या दुर्घटनेनंतर आरसीबीने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. त्याचबरोबर संघाने त्यांच्या स्मरणार्थ दीर्घकालीन आणि सार्थक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

‘आरसीबी केअर्स’ या नावाने नवे फाउंडेशन सुरू करण्यात आले असून, त्याचा उद्देश भविष्यातील सामन्यांमध्ये सुरक्षित आणि प्रभावी गर्दी व्यवस्थापनाची अंमलबजावणी करणे आहे. हे फाउंडेशन स्टेडियम अधिकारी, क्रीडा संघटना आणि आयपीएल भागीदारांसोबत काम करून अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यावर भर देईल.

शोकाकुल वातावरण

आरसीबीचा पहिला आयपीएल किताब हा खेळाडू व चाहत्यांसाठी अविस्मरणीय आनंदाचा क्षण होता. मात्र, झालेल्या दुर्घटनेमुळे हा उत्सव शोकाकुल झाला. आता संघ व्यवस्थापन, क्रिकेट विश्व आणि चाहत्यांसमोर या घटनेतून शिकून सुरक्षिततेच्या दृष्टीने जबाबदार पावले उचलण्याचे आव्हान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Mhaje Ghar Yojana: 'माझे घर'ला विरोध करणाऱ्यांना जवळ करू नका!- मुख्यमंत्री

Gold Price: ऐतिहासिक दरवाढ! धनत्रयोदशीपूर्वी सोन्याने केला मोठा धमाका, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 130000 लाखांच्या पार

Silent Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि धोकादायक परिणाम

EPFO PF Withdrawal: खुशखबर! PF मधून आता 100 टक्के रक्कम काढता येणार

Goa Crime: 'गॅस सिलिंडर'च्या वादातून जीवघेणा हल्ला; 3 आरोपींना पकडण्यासाठी गोवा पोलिसांचे राजस्थानात धाडसत्र

SCROLL FOR NEXT