Bengaluru Stampede: 11 जणांच्या मृत्यूनंतर RCB संघावर लवकरच बॅन? BCCI घेऊ शकते मोठा निर्णय

BCCI To Ban RCB: वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल ट्रॉफीवर अखेर बंगळुरूने आपले नाव कोरले. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील या संघाने चाहत्यांचे स्वप्न साकार करताना २०२५ चे आयपीएल विजेतेपद पटकावले.
BCCI To Ban RCB
BCCI To Ban RCBDainik Gomantak
Published on
Updated on

बंगळुरू: १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल ट्रॉफीवर अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने आपले नाव कोरले. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील या संघाने चाहत्यांचे स्वप्न साकार करताना २०२५ चे आयपीएल विजेतेपद पटकावले. विजयाच्या आनंदात संघाने चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठ्या विजयोत्सवाचे आयोजन केले होते. मात्र, या सोहळ्याला भीषण वळण लागले आणि साजरा केला जाणारा ऐतिहासिक क्षण शोकांतिका ठरला.

चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठ्या प्रमाणात जमलेल्या चाहत्यांच्या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत.गर्दीचे व्यवस्थापन अपुरे होते आणि आपत्कालीन यंत्रणा पुरेशी तैनात नव्हती. त्यामुळे हे भीषण संकट ओढवले, असा आरोप केला जात आहे.

BCCI To Ban RCB
Rapido In Goa: मोटरसायकल पायलटांवर संक्रांत! गोव्यात होणार ‘रॅपिडो’ची एंट्री; पारंपरिक व्‍यवसाय धोक्‍यात येण्याची चिन्हे

या घटनेनंतर आरसीबी संघ, कार्यक्रम आयोजक डीएनए एंटरटेनमेंट, आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणाच्या आरोपांखाली तपास सुरू असून, या घटनेला जबाबदार धरून काही जणांना अटकही करण्यात आली आहे. मृतांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या असून, न्यायालयीन प्रक्रियेला वेग आला आहे.

या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण झाला आहे की, आयपीएलसारख्या जगप्रसिद्ध लीगची प्रतिमा धुळीला मिळाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? बीसीसीआयला (BCCI) आता कडक निर्णय घ्यावा लागणार आहे.

जर तपासादरम्यान आरसीबीच्या व्यवस्थापनाचा थेट सहभाग निष्पन्न झाला, तर बोर्डला या संघाविरुद्ध कठोर कारवाई करावी लागेल. बीसीसीआयला आरसीबीविरुद्ध मोठी कारवाई करावी लागू शकते, जिथे बोर्ड त्यांना मर्यादित काळासाठी बंदी देखील घालू शकते.

BCCI To Ban RCB
Goa News: गोवा समग्र शिक्षा आर्थिक फसवणूक प्रकरणातील सुरू असलेला तपास अधिकृतपणे गुन्हे शाखेकडे वर्ग, वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

दोषींवर कठोर कारवाई, आणि भविष्यातील कार्यक्रमांसाठी सुरक्षितता धोरण अशा अनेक मुद्द्यांवर आता चर्चा सुरू आहे. आरसीबीच्या विजयानंतर साजरा करण्यासाठी जमलेली गर्दी शोकात बदलल्याने संपूर्ण देश हादरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com