Virat Kohli fan blood tilak poster Dainik Gomantak
देश

चाहत्याने मनगट कापले; कोहलीच्या पोस्टरवर लावला रक्ताचा टिळा, धक्कादायक Video Viral!

Virat Kohli fan wrist cut: एका अतिउत्साही विराट कोहलीच्या चाहत्याने थेट आपल्या रक्ताचा टिळा कोहलीच्या पोस्टरवर लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

Akshata Chhatre

बंगळूरु: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने अखेर आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावले असले तरी, या विजयाच्या जल्लोषाचा एक धक्कादायक पैलू समोर आला आहे. एका अतिउत्साही विराट कोहलीच्या चाहत्याने थेट आपल्या रक्ताचा टिळा कोहलीच्या पोस्टरवर लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत आणि आधुनिक क्रीडा संस्कृतीत चाहत्यांना काही मर्यादाच उरली नाहीये का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय.

विराटावरील 'अंधभक्ती'चा नमुना

व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये एक तरुण चाहता आपल्या हाताच्या मनगटावर कापून त्यातून निघालेल्या रक्ताने कोहलीच्या पोस्टरवरील कपाळावर टिळा लावताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. चाहत्यांच्या अशा वागणुकीमागे विराट कोहलीचा प्रभाव कारणीभूत आहे की आरसीबीच्या व्यापक चाहतावर्ग याला जबाबदार म्हणावा लागेल? काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी असा सवाल केला आहे.

आरसीबीच्या विजयानंर बंगळूरुमध्ये आधीच तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे संघाच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद, तर दुसरीकडे चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा बळी गेल्याने दुःखाचे सावट आहे.

या पार्श्वभूमीवर, हा धक्कादायक व्हिडिओ कट्टरतेची एक गडद बाजू समोर आणतो, जिथं चाहते क्रिकेटपटूनसाठी जीवावर उदार व्हायला देखील मागे पाहत नाहीयेत.

खेळातून लाखो लोकांमध्ये उत्कटता निर्माण होते आणि त्यांना एकत्र आणता येते हे खरे असले तरी, अशा प्रकारची टोकाची कृत्ये हे दर्शवतात की, कौतुक आणि समजूतदारपणा यांच्यात संतुलन राखणे किती महत्त्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

SCROLL FOR NEXT