Anushka Sharma-Virat Kohli visit Premanand Maharaj Dainik Gomantak
देश

Virat Kohli: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी 'किंग कोहली' पत्नी अनुष्कासह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक, पाहा Video

Virat Kohli Visits Premanand Maharaj: विराट कोहलीने सोमवारी (१२ मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी, मंगळवारी (१३ मे) विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासह वृंदावनमधील श्री राधा केळीकुंज आश्रमात पोहोचला.

Sameer Amunekar

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने सोमवारी (१२ मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी, मंगळवारी (१३ मे) विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासह वृंदावनमधील श्री राधा केळीकुंज आश्रमात पोहोचला. तिथं त्यांनी संत प्रेमानंद महाराज यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीदरम्यान कोहली आणि अनुष्कानं त्यांच्याशी काही काळ चर्चादेखील केली.

विराट कोहलीने याआधी ४ जानेवारी २०२३ रोजी पहिल्यांदा संत प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली होती. त्यानंतर १० जानेवारी २०२५ रोजी त्यांनी दुसऱ्यांदा आश्रमात हजेरी लावली होती. विराट कोहलीने बाराह घाटाजवळ राहणाऱ्या संत प्रेमानंदांच्या गुरू गौरांगी शरण यांनाही भेट दिली.

२०२५ च्या आयपीएलमध्ये विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे. भारत-पाकिस्तान वादामुळे आयपीएल काही काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. १७ मे रोजी लीग पुन्हा सुरू होणार असून, या दिवशी बंगळूरू संघाचा सामना आहे.

आरसीबी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सशी सामना करेल. ११ सामन्यांमध्ये ५०५ धावा काढणारा विराट कोहली ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या सूर्यकुमार यादवच्या नावावर ५१० धावा आहेत.

विराट कोहलीने कसोटी क्रिकेट रामराम ठोकला आहे. तो फक्त आता एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्याने १२३ सामने खेळले, ज्यामध्ये त्याच्या बॅटने ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या. विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीत ३० शतके आणि ३१ अर्धशतके झळकावली.

विराट कोहलीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ७ द्विशतके ठोकली जी एक विक्रम आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विराटने कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक ४० कसोटी सामने जिंकले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

SCROLL FOR NEXT