Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: 'NATURE' म्हणजे 'नटूरे'... शिक्षकांचं इंग्लिश पाहून सगळेच हैराण, व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

Viral Teacher Video: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात अनेकदा शिक्षकांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. मुलांना अभ्यास करण्यासोबत जीवनाचे धडे देताना अनेकदा शिक्षक दिसतात.

Manish Jadhav

Viral Teacher Video: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात अनेकदा शिक्षकांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. मुलांना अभ्यास करण्यासोबत जीवनाचे धडे देताना अनेकदा शिक्षक दिसतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका शिक्षिकेचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे, ज्यात तिचे इंग्रजी उच्चार (English Pronunciation) इतके विनोदी आहेत की ते ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडिओमध्ये शिक्षकांनी शब्दांचे जे उच्चार केले आहेत, ते ऐकल्यानंतर सोशल मीडियावर जणू उच्चारांच्या नवीन शाळेचाच शोध लागला आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा!

शिक्षकांचे अजब उच्चारण व्हायरल

@llandoniffirg नावाच्या 'एक्स' हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ केवळ भारतातीलच नव्हे, तर अनेक देशांतील शिक्षकांचे मजेशीर उच्चार दाखवतो. व्हिडिओमधील पहिली शिक्षिका DANGEROUS या शब्दाचा उच्चार चक्क "डंगर" असा करताना दिसत आहे. यानंतरच्या एका शिक्षिकेने (Teacher) तर उच्चारांची मर्यादाच ओलांडली. काही शिक्षक NATURE आणि FUTURE या शब्दांना अनुक्रमे "नटुरे" आणि "फटुरे" असे उच्चारताना दिसतात. तर एका शिक्षिकेने KNOWLEDGE हा शब्द "कनउ लद गए" असा वाचला.

मात्र, या व्हिडिओमधील सर्वात जास्त हसवणारा क्षण तो होता, जेव्हा एका शिक्षिकेने GOOGLE या शब्दाचा उच्चार "गुलु गुलु" असा केला. हे सर्व उच्चार इतके विनोदी आणि अपेक्षेपेक्षा वेगळे आहेत की, त्यामुळे हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना अक्षरशः हसू अनावर झाले आहे.

एक्सवर 1.1 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज

या विनोदी उच्चारांमुळे हा व्हिडिओ एक्स (X) प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओला आतापर्यंत 1.1 दशलक्षाहून अधिक (1.1 Million) व्ह्यूज मिळाले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर अनेक गमतीशीर प्रतिक्रिया येत आहेत.

यूजर्सच्या मजेशीर कमेंट्स

  • एका युजरने गमतीने लिहिले, "तुम्हाला माहित आहे का, गुगल या शब्दाची उत्पत्ती 'googol' या शब्दाच्या चुकीच्या स्पेलिंगमुळे झाली आणि आता तो GLOGLO बनला आहे."

  • दुसऱ्या एका युजरने प्रामाणिकपणे प्रतिक्रिया दिली की, "मी आज खूप काही नवीन शिकत आहे."

  • तिसऱ्या युजरने विनोदाने लिहिले की, "अखेरीस मला कळून चुकले की, मी या लोकांचे इंग्रजी का समजू शकत नाही!"

  • चौथ्या युजरने संमिश्र प्रतिक्रिया देत म्हटले, "माझ्या भाषेचा हा गैरवापर पाहून मला अपमानित वाटायला हवे की नाही, हे मला समजत नाहीये. पण, पहिल्या शिक्षकेचे उच्चारण ऐकून मला हसू आवरेना."

या व्हिडिओमुळे ऑनलाइन शिक्षणाच्या (Education) गुणवत्तेवर आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणावर (Teacher Training) प्रश्नचिन्ह उभे राहिले असले तरी, उच्चारांमधील गफलतीमुळे तो सध्या सोशल मीडियावर मनोरंजनाचा एक मोठा विषय ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

LIVE सामन्यात भयंकर राडा; भारताच्या खेळाडूंमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

Bicholim Crime: खाऊचं आमिष दाखवून चिमुरडीवर कारमध्ये अत्याचार; 47 वर्षीय आरोपीला अटक

Dodamarg: 20 फूट खोल ओहोळात कोसळलेली कार, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात; चालक सुदैवानं बचावला

Renuka Devi History: देव-असुरांमध्ये युद्ध चालू होते, श्रीविष्णूंनी वचन दिले की आदितीच्या गर्भातून जन्म घेतील; रेणुका मातेचा इतिहास

Viral Video: राजकारणासोबतच फुटबॉलमध्येही 'मास्टर'! CM प्रमोद सावंतांनी लगावला अचूक गोल, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT