Viral Video: राजकारणासोबतच फुटबॉलमध्येही 'मास्टर'! CM प्रमोद सावंतांनी लगावला अचूक गोल, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

CM Pramod Sawant FootBall Video: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या राजकीय कौशल्याची चर्चा नेहमीच होते. परंतु, आज ते नेहमीच्या राजकीय भूमिकेपेक्षा वेगळ्या रुपात दिसले.
CM Pramod Sawant FootBall Video
CM Pramod Sawant FootBall VideoDainik Gomantak
Published on
Updated on

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे राजकीय नेतृत्व आणि कौशल्य अनेकदा चर्चेचा विषय ठरते. परंतु, शनिवारी ते नेहमीच्या राजकीय भूमिकेपेक्षा वेगळ्या रुपात दिसले. ओमोणा साखळी येथे मुख्यमंत्री सावंतांनी फुटबॉल खेळताना आपली चपळाई आणि अचूक गोल करण्याची क्षमता दाखवली.

ओमोणा साखळी येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी फुटबॉल खेळताना आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले. या खेळात त्यांनी फक्त सहभाग घेतला नाही, तर अचूक गोलही केला. मुख्यमंत्र्यांचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

CM Pramod Sawant FootBall Video
Belgaum-Goa Highway: डोक्यावर, चेहऱ्यावर जखमा! तिरणेघाट पुलाखाली अंगणवाडी सेविकेचा आढळला मृतदेह; बेळगाव-गोवा महामार्गावरील घटनेने खळबळ

मुख्यमंत्री सावंतांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. अनेकांनी त्यांच्या या खेळाडूच्या रुपाचे कौतुक केले आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी टिप्पण्यांमध्ये त्यांच्या उत्साही खेळाने प्रेरित केले असल्याचे म्हटले आहे. काहींनी तर “राजकारणातच नव्हे, खेळातही मास्टर” असे कौतुक व्यक्त केले आहे.

CM Pramod Sawant FootBall Video
Goa Team Cricket Captain: गोव्याच्या महिला संघासाठी नवी कर्णधार! विनवी गुरव हिच्याकडे नेतृत्व; T20 मोहीमेला होणार सुरुवात

यावेळी उपस्थित असलेल्या खेळाडूंनीही त्यांचा खेळ पाहून कौतुक केले. फुटबॉलमधील या अद्वितीय क्षणामुळे मुख्यमंत्री सावंतांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com