Rickshaw drivers fighting on street video Dainik Gomantak
देश

Viral Video: "तो प्रवासी माझाच!" भररस्त्यात सुरू झाली रिक्षावाल्यांची 'WWE'; प्रवाशाने ठोकली धूम, व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल

Fight Viral Video: आजकाल इंटरनेटच्या दुनियेत दररोज काहीतरी नवीन आणि धक्कादायक पाहायला मिळते.

Sameer Amunekar

आजकाल इंटरनेटच्या दुनियेत दररोज काहीतरी नवीन आणि धक्कादायक पाहायला मिळते. कधी मेट्रोमधील वाद, तर कधी सार्वजनिक ठिकाणचे भांडण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असते. अशातच सध्या एका नव्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ कोणत्याही चित्रपटातील फाईट सीनपेक्षा कमी नाही. दोन व्यक्तींमध्ये झालेल्या या वादामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती, तर येणारे-जाणारे लोक या घटनेकडे केवळ पाहत उभे राहिलेले दिसले.

नेमकी घटना काय घडली?

व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये दोन रिक्षाचालक भररस्त्यात एकमेकांवर तुटून पडल्याचे दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण वाद एका प्रवाशाला (सवारी) आपल्या रिक्षात बसवण्यावरून सुरू झाला. दोन्ही चालकांना एकच प्रवासी हवा होता. सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली, मात्र पाहता पाहता या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. दोघांनीही भररस्त्यात एकमेकांना बेदम चोप देण्यास सुरुवात केली.

भीतीने प्रवासी पळाला, पण भांडण थांबेना!

या घटनेचे सर्वात आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे, ज्या प्रवाशासाठी हा सगळा राडा सुरू होता, तो रिक्षात बसलेला प्रवासी भांडण वाढताना पाहून घाबरला आणि गुपचूप रिक्षातून खाली उतरून निघून गेला. मात्र, तरीही दोन्ही चालकांचा राग शांत झाला नाही. ते रस्त्यावर एकमेकांना खाली पाडून मारहाण करत राहिले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजूबाजूला अनेक लोक उपस्थित होते, पण कोणीही पुढे येऊन हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. प्रत्येकजण केवळ तमाशा पाहत उभा राहिला.

नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आणि संताप

हा व्हिडिओ 'घर के क्लेश' नावाच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. काही युजर्सनी वाढत्या महागाईमुळे आणि पोटापाण्याच्या चिंतेमुळे लोकांचा संयम सुटत चालल्याची खंत व्यक्त केली आहे. तर काहींनी मजेशीर मीम्स शेअर करत या घटनेची खिल्ली उडवली आहे. "प्रवासी तर निघून गेला, आता हे दोघे नक्की कोणासाठी लढत आहेत?" असा खोचक सवाल एका युझरने केला आहे. दैनंदिन जीवनातील वाढता ताणतणाव अशा हिंसक स्वरूपात बाहेर पडत असल्याबद्दल अनेकांनी चिंताही व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT