Video Viral Dainik Gomantak
देश

Video Viral: धक्कादायक! खुलेआम फायरिंगचा व्हिडिओ व्हायरल; माय-लेकीचा मृत्यू, वडिलांची प्रकृती चिंताजनक

Patna Firing Video Viral: बिहारची राजधानी पाटणा येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. येथे दुचाकीस्वार दिवसाढवळ्या गोळीबार करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Manish Jadhav

Patna Firing Video Viral: बिहारची राजधानी पाटणा येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. येथे दुचाकीस्वार दिवसाढवळ्या गोळीबार करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. दुचाकीस्वारांनी एका घरात घुसून एकाच कुटुंबातील 3 जणांवर गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये आई आणि मुलीचा मृत्यू झाला तर वडिलांची प्रकृती गंभीर आहे. घरात गोळीबार केल्यानंतर गुन्हेगारांनी पळून जातानाही गोळीबार केला, ज्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले.

आधी हा व्हिडिओ पाहा

दरम्यान, ही घटना पाटण्यातील आलमगंज येथील न्यू अरफाबाद कॉलनीतील जटाही मंदिराजवळ घडली, जिथे गुन्हेगारांनी पती, पत्नी आणि मुलीवर गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी वडिलांवर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. घटनेनंतर गुन्हेगारांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

निवृत्त परिचारिका आणि तिच्या मुलीचा मृत्यू

माहिती मिळताच आलमगंज पोलिस ठाण्याचे पोलिस (Police) घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ तिन्ही पिडितांना पाटण्यातील नालंदा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले. जखमीचे नाव धनंजय मेहता असे आहे, तर त्यांची पत्नी, निवृत्त परिचारिका महालक्ष्मी आणि 19 वर्षांची मुलगी यांचा मृत्यू झाला. हे प्रकरण परिसरातील वादाचे असल्याचे सांगितले जात आहे.

पोलीस आरोपींच्या शोधात व्यस्त

पाटणा शहर पोलीस उपविभागीय अधिकारी अतुलेश झा यांनी या प्रकरणाची पुष्टी केली. झा यांनी सांगितले की, पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी एफएसएल टीम आणि श्वान पथकाला बोलावले. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे देखील स्कॅन करण्यास सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT