Viral Video: गायीला आवरला नाही फ्राइड राइसचा मोह... गोव्यातील ऑस्ट्रेलियन इन्फ्लुएंसर व्हिडिओ व्हायरल!

Australian Content Creator Viral Video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, रिल्स व्हायरल होत असतात. गोव्यात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑस्ट्रेलियन कंटेंट क्रिएटर डी इव्हान्सचा हा व्हिडिओ आहे.
Aussie Bhai Cow Video Viral
Aussie Bhai Cow Video ViralInstagram
Published on
Updated on

Aussie Bhai Cow Video Viral: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, रिल्स व्हायरल होत असतात. गोव्यात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑस्ट्रेलियन कंटेंट क्रिएटर डी इव्हान्सचा हा व्हिडिओ आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा

गायीचं फ्राइड राइसवर लक्ष

अलिकडेच, इंस्टाग्रामवर (Instagram) इव्हान्सने असा एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला, ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. व्हिडिओच्या सुरुवातीला अँडी गोव्यातील समुद्रकिनारी पहुडलेला दिसत आहे. त्याच्या हातात फ्राइड राइसची प्लेट आहे. समुद्राच्या लाटांची लय आणि सौम्य सूर्यप्रकाशाचा आनंद इव्हान्स घेत असतानाच एक गाय त्याच्याजवळ येते आणि थोडावेळ तशीच थांबते. त्यानंतर गाय हळूहळू इव्हान्सच्या हातात असणाऱ्या फ्राइड राइसकडे लक्ष केंद्रित करु लागते. जणू काही इव्हान्सला भाई मला पण फ्राइड राइसचा एक चम्मच दे असे म्हणताना दिसते.

Aussie Bhai Cow Video Viral
Viral Video: क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचे निधन? कराचीमध्ये अंत्यसंस्कार? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ, जाणून घ्या सत्य

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

अँडी इव्हान्सने हा व्हिडिओ @theaussiebhai या हँडलवर पोस्ट केला. सोशल मीडिया (Social Midea) यूजर्स स्वत:ला हा व्हिडिओ पाहण्यापासून रोखू शकले नाहीत. एकाने लिहिले की, केवळ भारतातच तुमची समुद्रकिनारी ट्रिप गो-कॉ-होस्ट करते. तर दुसऱ्याने लिहिले की, ही गाय सुसंस्कृत निघाली. तिसऱ्याने लिहिले की, ती गाय कॅमेरा देखील समजते. ती एकदम स्टारसारखी वागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com