Panic attack on airplane | Passenger slapped in flight Dainik Gomantak
देश

Viral Video: विमानात पॅनिक अटॅक आलेल्या प्रवाशाला दुसऱ्याने मारली थप्पड; पाहा व्हिडिओ

Watch Video: इंडिगो एअरलाइन्सने एक अधिकृत निवेदन जारी करून प्रवाशाच्या या कृतीचा तीव्र निषेध केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

मुंबईहून कोलकाताला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमान क्रमांक 6E-138 मध्ये एक धक्कादायक घटना घडली. विमानात एका प्रवाशाने अचानक दुसऱ्या प्रवाशाला थप्पड मारली. यावेळी त्या प्रवाशाला पॅनिक अटॅक आला होता. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, पॅनिक अटॅक आलेल्या एका प्रवाशाला एअर होस्टेस मदत करत होती. त्याच वेळी दुसऱ्या प्रवाशाने त्याला जोरदार चापट मारली. या घटनेनंतर, फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या दुसऱ्या प्रवाशांनी तुम्ही असे का केले? म्हणून जाब विचारला.

यावर मला याचा त्रास होत आहे, असे उत्तर त्याने दिले. दरम्यान, तुम्हाला कोणावरही हात उचलण्याचा अधिकार नाही, असे इतर प्रवाशांनी त्यांना सुनावले.

विमानात सहप्रवाशाला थप्पड मारणाऱ्या आरोपीचे नाव हाफिजुल रहमान असे आहे. विमान कोलकाता येथे पोहोचताच त्याला प्रथम सीआयएसएफच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर त्याला विमानतळावरील एनएससीबीआय पोलिस ठाण्यात नेण्यात आले, जिथे त्याला विधाननगर पोलिसांनी अटक केली.

इंडिगो एअरलाइन्सने काय म्हटले?

इंडिगो एअरलाइन्सने एक अधिकृत निवेदन जारी करून प्रवाशाच्या या कृतीचा तीव्र निषेध केला. आमच्या विमानात झालेल्या या हाणामारीच्या घटनेची आम्हाला जाणीव आहे. असे अनुशासनहीन वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि आमच्या प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला आणि प्रतिष्ठेला तडजोड करणाऱ्या कोणत्याही कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे इंडिगोने म्हटले आहे.

आरोपी प्रवाशाची ओळख पटवून त्याला बेशिस्त घोषित करण्यात आले आणि विमान कोलकाता पोहोचताच त्याला सुरक्षा एजन्सींच्या ताब्यात देण्यात आले. क्रू टीमने निर्धारित मानक कार्यपद्धती (एसओपी) नुसार काम केले आणि सर्व संबंधित नियामक एजन्सींना माहिती देण्यात आली, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahadevi Elephant: जनतेनं संघर्ष टाळावा, आमच्यासोबत उभं राहावं; वनतारानं स्पष्ट केली भूमिका; नेमकं काय केलंय आवाहन?

Friendship Day 2025: फ्रेंडशिप डे स्पेशल! तुमच्या जिगरी मित्राला पाठवा 'हे' खास संदेश

IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT