Beef Smuggling: नावेलीत बेकायदा कत्तलखान्याचा पर्दाफाश, 700 किलो गोमांस जप्त! एकाला अटक

Margao: नागमोडे-नावेली येथील बेकायदा कत्तलखान्याचा बजरंग दल गोरक्षाने पर्दाफाश केला. एका पिकअप रिक्षेत साठवून ठेवलेले अंदाजे ७०० किलो बीफ जप्त केले.
Beef Smuggling
Beef SmugglingDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: नागमोडे-नावेली येथील बेकायदा कत्तलखान्याचा बजरंग दल गोरक्षाने पर्दाफाश केला. एका पिकअप रिक्षेत साठवून ठेवलेले अंदाजे ७०० किलो बीफ जप्त केले. तसेच एका रेड्याची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी मडगाव पोलिसांनी हैदर बेपारी याला ताब्यात घेऊन नंतर अटक केली. बजरंग दल व जिल्हा प्राणी क्रूरता प्रतिबंधक समितीच्या अधिकाऱ्यांकडून येथे चालू असलेला हा गैरव्यवहार उघडकीस आणला.

गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता नागमोडे-नावेलीतील स्थानिकांकडून रस्त्यावर रक्त दिसून आल्याची व बेकायदेशीर गुरांची कत्तल झाल्याचा संशय मडगाव बजरंग दलाचे कार्यकर्ते भगवान रेडकर यांच्याकडे व्यक्त केला.

Beef Smuggling
Goa Public University Bill: 'सार्वजनिक विद्यापीठे' स्थापनेचा मार्ग सुकर, ऐतिहासिक बदलांसाठी विधेयक सादर

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी येऊन पाहिले असता रक्त आढळलेल्या ठिकाणापासून नजिकच एका टाटा पिकअप रिक्षेत रेड्याचे मांस आढळून आले. यावेळी दक्षिण गोवा जिल्हा प्राणी क्रूरता प्रतिबंधक समितीचे अधिकारी राज हे देखील दाखल झाले. तसेच मडगाव पोलिसांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले.

Beef Smuggling
Goa Assembly: कोळशाचा विषय पुन्‍हा पेटला, मुख्‍यमंत्री-सिक्‍वेरांच्‍या उत्तरातील तफावतीमुळे विरोधकांचा हंगामा! कामकाज 10 मिनिटं स्‍थगित

पिकअप रिक्षेमध्ये दोन रेड्यांची बेकायदेशीर कत्तल करून अंदाजे ७०० किलो मांस ठेवण्यात आले होते. रेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नागमोडी-नावेली या ठिकाणी बेकायदेशीर गुरांच्या कत्तलीचा प्रकार स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार उघडकीस आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com