Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: ओव्हरस्पीडिंगचा थरार! वळणावर नियंत्रण सुटलं अन् तोंड फुटलं, बाईकस्वाराचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही बघितलात का?

Viral Video Overspeeding Bike Accident: रस्त्यावरुन वाहन चालवताना प्रत्येकानेच वेगावर नियंत्रण ठेवणे आणि आपले संपूर्ण लक्ष समोर असणे अत्यंत गरजेचे असते.

Manish Jadhav

Viral Video Overspeeding Bike Accident: रस्त्यावरुन वाहन चालवताना प्रत्येकानेच वेगावर नियंत्रण ठेवणे आणि आपले संपूर्ण लक्ष समोर असणे अत्यंत गरजेचे असते. यात जराही निष्काळजीपणा दाखवणे म्हणजे स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करण्यासारखे आहे. अनेकदा रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांमध्ये इतरांची चूक नसून स्वतः वाहनचालकाचा अतिवेग किंवा बेजबाबदारपणा कारणीभूत असतो.

सध्या सोशल मीडियावर (Social Media) अशाच एका भयानक रस्ते अपघाताचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चालकाच्या एकाच चुकीमुळे दोन जणांचा जीव धोक्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

हा व्हायरल झालेला व्हिडिओ एखाद्या डोंगराळ भागातील किंवा घाटातील असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तिथल्याच एका दुकानाच्या किंवा घराच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा संपूर्ण थरार कैद झाला. व्हिडिओमध्ये एक अतिशय तीव्र आणि धोकादायक वळण दिसत आहे. त्याचवेळी एका वळणावर एक दुचाकीस्वार अत्यंत वेगाने बाईक चालवत येताना दिसतो. रस्ता वळणाचा असूनही त्याने आपल्या गाडीचा वेग कमी करण्याची तसदी घेतली नाही. त्याची हीच चूक त्याच्याच अंगाशी आली.

वेग जास्त असल्याने वळणावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि बाईक थेट घसरुन भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी झालाच, पण त्याच्यासोबत मागे बसलेला दुसरा तरुणही जोरदार फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. अपघातानंतर पुढे त्यांचे काय झाले, हे या व्हिडिओमध्ये समजू शकलेले नाही.

'एक्स'वर हा व्हिडिओ @anupamx9ce नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला. इंटरनेटवर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून आतापर्यंत हजारो लोकांनी तो पाहिला. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये अत्यंत महत्त्वाचा संदेश देण्यात आला, ज्यामध्ये लिहिले की, 'अपघात वळणामुळे नाही, तर अतिवेगामुळे झाला. रस्त्यावर वेग नाही, तर समजूतदारपणा दाखवा. माहिती जनहितार्थ जारी.' हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर तीव्र संताप आणि चिंता व्यक्त केली.

हा थरारक व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. एका युझरने लिहिले, 'अपघातांपासून वाचण्यासाठी नेहमी शांत डोक्याने आणि समजूतदारपणाने वाहन चालवले पाहिजे.' दुसऱ्या एका युझरने संताप व्यक्त करत लिहिले, 'जर तुम्ही प्रमाणाबाहेर ओव्हरस्पीडिंग कराल, तर शेवटी अशीच अवस्था होणार.' तर तिसऱ्या युझरने म्हटले, 'असे बेजबाबदार चालक स्वतः तर मरतातच, पण रस्त्यावरील इतर निष्पाप लोकांनाही सोबत मारतात.' हा व्हिडिओ सध्या वाहनचालकांसाठी एक मोठा धडा ठरत असून वेगाच्या आहारी न जाण्याचे आवाहन या माध्यमातून केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT