Manali foreign tourist harassment video Dainik Gomantak
देश

Viral Video: जवळ गेला, पायाला स्पर्श केला अन्...; मनालीत टवाळखोरांकडून परदेशी तरुणीची छेडछाड; संतापजनक प्रकार CCTV मध्ये कैद

Manali foreign tourist harassment video: निसर्गरम्य वातावरण आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील मनाली शहरातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.

Sameer Amunekar

मनाली: निसर्गरम्य वातावरण आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील मनाली शहरातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. भरदिवसा रस्त्यावरून चालणाऱ्या एका विदेशी महिला पर्यटकेची काही टवाळखोर तरुणांनी छेडछाड केल्याची घटना घडली असून, याचे सीसीटीव्ही फुटेज समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, 'देवभूमी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमाचलच्या प्रतिमेला या नराधमांमुळे तडा गेला आहे.

हसत-खेळत आले आणि माणुसकी विसरले

व्हायरल झालेल्या अवघ्या ३६ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, दुपारी पावणेदोनच्या सुमारास एका सार्वजनिक रस्त्यावर लोकांची ये-जा सुरू आहे. यादरम्यान, काही तरुण तिथे येतात. त्यापैकी एकाने लाल टी-शर्ट घातला असून तो हसत फिरताना दिसतो. त्यानंतर त्याचे इतर दोन साथीदार तिथे पोहोचतात. समोरून एक विदेशी महिला पर्यटक शांतपणे चालत येत असताना, पांढऱ्या टी-शर्टमधील एक तरुण तिच्या जवळ जातो आणि तिला स्पर्श करून वेगाने पुढे निघून जातो.

धक्क्याने जागीच थबकली विदेशी महिला

भररस्त्यात आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या अनपेक्षित प्रकारामुळे ती विदेशी महिला पूर्णपणे हादरून गेली. काही क्षणांसाठी ती जागीच थबकली आणि तिला काय करावे हे सुचेनासे झाले. सुरक्षिततेच्या आशेने भारतात आलेल्या एका पाहुण्या महिलेसोबत असा व्यवहार व्हावा, ही बाब अत्यंत क्लेशदायक आहे. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर एक व्यक्ती असे म्हणताना ऐकू येते की, "हे लोक असे कृत्य करतात आणि नंतर म्हणतात की स्थानिक लोक पर्यटकांना मारतात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा जेणेकरून या नराधमांचे चेहरे जगासमोर येतील."

सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक आणि कारवाईची मागणी

हा व्हिडिओ 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर करण्यात आल्यानंतर नेटिझन्सनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. अनेक युजर्सनी हिमाचल प्रदेश पोलिसांना टॅग करून विचारले आहे की, "अशा विकृत लोकांमुळेच विदेशी पर्यटक भारतात येण्यास कचरतात. जर या तरुणांना त्वरित अटक झाली नाही, तर जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलीन होईल." एका परदेशी युजरनेही यावर आपली व्यथा मांडली असून, दुसऱ्या देशात जाऊन अशा परिस्थितीला सामोरे जाणे किती भयानक असते, हे अधोरेखित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT