Viral Bike Stunt Video Dainik Gomantak
देश

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Viral Bike Stunt Video: सध्या असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यातील स्टंट पाहून कोणाचाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही आणि क्षणभरासाठी काळजाचा ठोका चुकेल.

Manish Jadhav

Viral Bike Stunt Video: आजच्या काळात सोशल मीडिया हे प्रसिद्धी मिळवण्याचे एक प्रमुख माध्यम बनले आहे. व्ह्यूज, लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्याच्या नादात लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, याचा प्रत्यय आणून देणारे असंख्य व्हिडिओ रोज इंटरनेटवर व्हायरल होतात. काही लोक धावत्या ट्रेनच्या दारात लटकून जीवघेणे स्टंट करतात, तर काही कार आणि बाईकवर धोकादायक कसरती करुन स्वतःचा जीव धोक्यात घालतात. पण सध्या असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यातील स्टंट पाहून कोणाचाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही आणि क्षणभरासाठी काळजाचा ठोका चुकेल.

साधारणपणे आपण सर्वांनीच लहानपणी किंवा जत्रेत झाडाला दोरी बांधून झोका घेतला असेल. मात्र, कधी बाईकचा झोका बनवून त्यावर कोणी स्टंट करताना पाहिले आहे का? व्हायरल होत असलेल्या या अजब व्हिडिओमध्ये एका पठ्ठ्याने चक्क झाडाच्या भल्या मोठ्या फांदीला जाड दोऱ्या बांधून खाली एका बाईकला टांगले आहे. एवढ्यावरच न थांबता तो तरुण त्या बाईकवर स्वार होऊन हवेत उंचावर झोके घेत आहे. एका बाईकचे वजन किती असू शकते, याची कल्पना सर्वांनाच आहे. अशा वेळी जर झाडाची फांदी तुटली किंवा ती दोरी तुटली, तर गंभीर अपघात होऊन त्या तरुणाच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

पण केवळ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होण्याच्या आणि रील बनवण्याच्या वेडामुळे या तरुणाने आपल्या जीवाची पर्वा न करता हा धोकादायक स्टंट केला.

हा थक्क करणारा व्हिडिओ 'एक्स'वर @drx_gulzar नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, "हा स्टंट पाहून माझे डोकेच फिरले, रील आणि व्ह्यूजच्या नादात लोक काहीही करत आहेत; या मूर्ख व्यक्तीसाठी दोन शब्द नक्की लिहा." हा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड होताच त्याला हजारो लोकांनी पाहिले असून नेटकऱ्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, "हे लोक फक्त प्रसिद्धीसाठी स्वतःचा जीव धोक्यात का घालतात? यांना स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा जराही विचार कसा येत नाही?" तर दुसऱ्या एका युजरने, "हा तर महामूर्खपणाचा उत्तम नमुना आहे," अशी टीका केली. सोशल मीडियावर सध्या या तरुणाचा स्टंट आणि त्याच्या या अजब प्रकाराची जोरदार चर्चा रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT