Viral Video: वन विभागाची वाट कसली बघताय? पठ्ठ्यानं महाकाय मगरीला खांद्यावर टाकलं अन् थेट पोलीस ठाणं गाठलं! व्हिडिओ व्हायरल

Viral Video Giant Crocodile: बिहारमधील सुपौल जिल्ह्यात घडलेल्या एका अनोख्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Bihar Viral crocodile video
Bihar Viral crocodile videoDainik Gomantak
Published on
Updated on

बिहारमधील सुपौल जिल्ह्यात घडलेल्या एका अनोख्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेतात अचानक मगर आढळल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी मगर पाहताच एकच गोंधळ उडाला आणि काही वेळातच घटनास्थळी मोठी गर्दी जमली. मात्र, घाबरून पळापळ करण्याऐवजी काही तरुणांनी धाडस आणि प्रसंगावधान दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणली.

ग्रामस्थांनी धाडसाने पकडली मगर

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मगर शेतात फिरताना दिसताच काही युवकांनी अत्यंत सावधगिरीने तिला वेढा घातला. कोणतीही इजा न पोहोचवता त्यांनी दोरीच्या साहाय्याने मगर सुरक्षितपणे ताब्यात घेतली.

वन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तातडीने प्रतिसाद न मिळाल्याने एका तरुणाने मगर खांद्यावर उचलली आणि थेट स्थानिक पोलीस ठाण्यात नेली. हा संपूर्ण प्रकार उपस्थितांनी मोबाईलमध्ये चित्रित केला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

पोलीस ठाण्यात मगर आणल्यानंतर पोलिसांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मगर ताब्यात घेत तिची आरोग्य तपासणी केली. तपासणीत मगर पूर्णपणे निरोगी असल्याचे स्पष्ट झाले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.

Bihar Viral crocodile video
Goa Fishing Season: बेतुल-मालीम जेटींवर मासेमारी हंगामाला विलंब; हवामान आणि मजूर टंचाईने मच्छीमार चिंतेत

पावसाळ्यात वाढतो वन्यजीवांचा वावर

वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, पावसाळ्यात नद्यांमधील पाणीपातळी वाढल्यामुळे जलमार्ग एकमेकांशी जोडले जातात. त्यामुळे मगर, साप आणि इतर वन्यजीव अनेकदा शेतांमध्ये किंवा मानवी वस्तीजवळ पोहोचतात. अशा परिस्थितीत घाबरून जाऊन स्वतः कारवाई करण्याऐवजी संबंधित विभागाला त्वरित माहिती देणे अधिक सुरक्षित ठरते.

नागरिकांना वन विभागाचे महत्त्वाचे आवाहन

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच मगरलाही कोणतीही दुखापत झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात मगर किंवा इतर कोणताही वन्यजीव आढळल्यास त्याला त्रास देऊ नये किंवा अफवा पसरवू नयेत.

Bihar Viral crocodile video
Goa Accident: भीषण अपघात! पणजीहून मडगावकडे जाणारी कार डिव्हायडरवर आदळून पेटली; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

प्रशिक्षित पथकाला माहिती दिल्यास अशा प्राण्यांची सुरक्षित सुटका करून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे शक्य होते. दरम्यान, मगर खांद्यावर घेऊन चालणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून त्याच्या धाडसासोबतच सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com