Shocking Viral Video: वर्गातच पॅन्ट काढली, लघवी केली अन्... मुख्याध्यापकाचं विद्यार्थ्यांसमोर अश्लील कृत्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Janjgir Champa School Headmaster Viral Video: छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यातील पामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली.
Janjgir Champa School Headmaster Viral Video
Shocking Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Chhattisgarh School Headmaster Arrested: छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यातील पामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली. येथील डोंगाकोहरौद शासकीय प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले मुख्याध्यापक भुवनेश्वर कौशिक यांच्यावर शाळेच्या वेळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोर अश्लील कृत्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या विकृत मुख्याध्यापकाने वर्गात विद्यार्थ्यांसमोर अश्लील चाळे करण्याचा आणि त्यांना चुकीच्या उद्देशाने जवळ बोलावण्याचा प्रयत्न केला.

या घृणास्पद प्रकारामुळे प्रचंड घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेची वेळ संपताच घरी जाऊन पालकांना सर्व हकीकत सांगितली, ज्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांचा संताप अनावर झाला.

Janjgir Champa School Headmaster Viral Video
Goa Crime: 'रोड रेज'च्या वादातून सुरीने वार; तरुण गंभीर, नास्नोळा येथील घटना; संशयिताला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी चौथी आणि पाचवीचे विद्यार्थी अभ्यासात व्यस्त असताना, शेजारच्या वर्गात मुख्याध्यापक भुवनेश्वर कौशिक अश्लील स्थितीत बसले होते. जेव्हा काही मुले अभ्यासाबाबत विचारण्यासाठी त्यांच्याकडे गेली, तेव्हा त्यांनी चिमुकल्यांसमोरच अश्लील कृत्य केले आणि मुलींना आपल्याजवळ बोलावून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेने घाबरलेल्या मुलींनी तातडीने घर गाठून पालकांना घडलेला प्रकार सांगितला. मुलांच्या तोंडून ही हकीकत ऐकताच संतप्त झालेले पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने शाळेत जमा झाले. त्यावेळीही मुख्याध्यापक महाशय अर्धनग्न अवस्थेत खुर्चीवर बसलेले आढळले.

Janjgir Champa School Headmaster Viral Video
Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

ग्रामस्थांनी तातडीने या घटनेचा मोबाईलवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे घाबरलेले मुख्याध्यापक घाईघाईत आपले कपडे घालू लागले. घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी पोलिसांच्या 'डायल-112' या आपत्कालीन सेवेला फोन करुन माहिती दिली. माहिती मिळताच पामगड पोलीस ठाण्याचे पथक शाळेत पोहोचले आणि त्यांनी संतप्त जमावाच्या तावडीतून आरोपी मुख्याध्यापकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.

Janjgir Champa School Headmaster Viral Video
Goa Crime News: 'ती' अवघ्या 15 वर्षांची! बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आलं भयानक सत्य, उत्तर प्रदेशच्या तरूणाला बेड्या

पोलीस (Police) ठाण्यात पीडित विद्यार्थिनी आणि पालकांचे जबाब नोंदवून घेण्यात आले असून, आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. या घटनेची दखल घेत जांजगीर-चंपाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोषी मुख्याध्यापकावर तात्काळ कठोर निलंबनाची आणि कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com