Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: प्रसिध्द होण्यासाठी कायपण, तरूणीने म्हशीच्या अंगावर चढून केला डान्स, व्हिडिओ पाहून डोक्यावर हात माराल

Giirl Dance Viral Video: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे रील बनवतात. यात काहीच गैर नाही, मात्र जेव्हा प्रसिद्धीच्या नादात लोक अत्यंत विचित्र आणि धोकादायक कृती करतात.

Sameer Amunekar

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे रील बनवतात. यात काहीच गैर नाही, मात्र जेव्हा प्रसिद्धीच्या नादात लोक अत्यंत विचित्र आणि धोकादायक कृती करतात, तेव्हा त्या कृतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. अशाच एका व्हिडिओने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक तरुणी भोजपुरी गाण्यावर नाचत रील तयार करत आहे. परंतु खास बाब म्हणजे ती हा नाच आपल्या खोलीत किंवा घराच्या अंगणात करत नसून, थेट एका जिवंत म्हशीच्या पाठीवर उभी राहून करत आहे. तिच्या नृत्याच्या वेळी घरातील इतर लोक जवळ उभे असल्याचे दिसते. हे लोक कदाचित ती म्हशीवरून पडल्यास तिला वाचवण्यासाठी किंवा प्राण्याला चिडू न देण्यासाठी तिथे उभे होते.

तथापि, केवळ रीलसाठी एखाद्या प्राण्याला अशा प्रकारे त्रास देणे ही प्राण्यांवरील क्रूरतेचीच एक उदाहरण ठरते, असे अनेक वापरकर्ते म्हणत आहेत.

हा व्हिडिओ @ChapraZila नावाच्या अकाउंटवरून ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "स्वतःला प्रसिद्ध करण्याच्या नादात कोणालाही त्रास देऊ नका."

व्हिडिओला ४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्याने मजेशीर कमेंट करत लिहिले — "म्हशीवर नागिन." तर दुसऱ्याने लिहिले — "म्हशीची पाठ काकू मोडेल." काही वापरकर्त्यांनी मात्र यावर हसणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या असून, काहींनी याला धोकादायक आणि गैरजबाबदार कृत्य ठरवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curlies Restaurant Sealed: मोठी कारवाई! गोव्यातील वादग्रस्त 'कर्लिस' रेस्टॉरंटला अखेर प्रशासनाने ठोकले टाळे; हडफडे दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार संघाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

सातारा-सोलापूर महामार्गावर 48 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त, 5 जणांना बेड्या; महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई!

Bangladesh Violence: बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीना विरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार; भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

कंडोमवरचा टॅक्स कमी करा; पाकिस्तानने IMF समोर पुन्हा पसरले हात, पदरी पडली निराशा

SCROLL FOR NEXT