AFC Champions League 2: FC Goa समोर ओमानमधील अल सीब क्लबचे खडतर आव्हान, सुपर कपनंतर रंगणार सामना

FC Goa vs Al Seeb Club: एएफसी चँपियन्स लीग २ फुटबॉल स्पर्धेतील जागेसाठी एफसी गोवा आणि ओमानमधील अल सीब क्लब यांच्यात चुरस आहे.सामने फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल.
Manolo Marquez FC Goa
Manolo Marquez FC GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: एएफसी चँपियन्स लीग २ फुटबॉल स्पर्धेतील जागेसाठी एफसी गोवा आणि ओमानमधील अल सीब क्लब यांच्यात चुरस आहे. त्यांच्यातील सामने बुधवारी (ता. १३) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल.

ओमानची राजधानी मस्कतच्या वायव्येस असलेल्या अल सीब शहरातील संघ मातब्बर आहे, त्यामुळे एफसी गोवासमोर खडतर आव्हान असेल. फातोर्ड्यात होणाऱ्या प्ले-ऑफ लढतीतील विजेता संघ चँपियन्स लीग २ स्पर्धेसाठी पात्रता मिळवेल, तर पराभूत संघ एएफसी चॅलेंज लीग स्पर्धेत खेळेल. साहजिकच बुधवारची लढत दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे.

मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने शंभर दिवसांपूर्वी ओडिशातील भुवनेश्वर येथे सुपर कप जिंकून प्ले-ऑफ लढतीसाठी पात्रता मिळविली. २०२५-२६ मोसमासाठी मार्केझ यांना प्रशिक्षकपदी मुदतवाढ मिळाली असून ते आशियाई पातळीवरील स्पर्धेत आगेकूच राखण्यासाठी प्रयत्नशील असतील. मात्र सुपर कप जिंकल्यानंतर एफसी गोवा संघ स्पर्धात्मक सामने खेळलेला नाही.

Manolo Marquez FC Goa
Javier Siverio: 'हमखास गोल नोंदविणारा खेळाडू'! स्पॅनिश हावियर FC Goa टीममध्ये; प्रशिक्षक मार्केझनी केले कौतुक

नव्या मोसमासाठी त्यांनी बचावपटू पोल मोरेनो, मध्यरक्षक डेव्हिड तिमोर, आघाडीपटू हावियर सिव्हेरियो या स्पॅनिश फुटबॉलपटूंना संघात सामावून घेतले असून स्पेनचे इकेर ग्वॉर्रोचेना व बोर्हा हेर्रेरा, तसेच सर्बियन देयान द्राझिच यांना कायम राखले आहे. एफसी गोवाच्या गतमोसमातील संघात विशेष बदल नाही. हर्ष पत्रे व रॉनी विल्सन हे भारतीय फुटबॉलमधील नवे चेहरे संघात दाखल झाले आहेत.

Manolo Marquez FC Goa
Iker Guarrotxena: 'गोव्याला माझे घर मानतो'! स्पॅनिश ग्वॉर्रोचेनाचे प्रतिपादन; मोसमअखेरपर्यंत FC Goa संघात

ओमानमधील संघ दमदार

रुमानियन व्हॅलेरियू टिटा यांच्या मार्गदर्शनाखालील अल सीब क्लब अनुभवी आहे. गतमोसमात ओमान प्रोफेशनल लीग स्पर्धा जिंकून त्यांनी प्ले-ऑफसाठी पात्रता मिळविली. या संघाने २०२२ मध्ये एएफसी कप जिंकला होता, तर २०२४-२५ मध्ये एएफसी चॅलेंज लीगच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, गोव्यात दाखल होण्यापूर्वी अल सीब क्लब स्पर्धात्मक सामने खेळला आहे. ओमान सुपर कप लढतीत गोलशून्य बरोबरीनंतर त्यांना पेनल्टी शूटआऊटमध्ये अल शबाब क्लबविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता, त्यानंतर झालेल्या मैत्रीपूर्ण स्पर्धात्मक लढतीत त्यांनी लक्षवेधक खेळ केला. अल सीब क्लबने सेनेगलचा आघाडीपटू अब्दुलअझिज सेस्से याला करारबद्ध केले असून मारवान तुआईब अल सियाबी संघात पुन्हा दाखल झाला आहे. ओमान राष्ट्रीय संघातील मध्यरक्षक अब्दुल्ला फवाझ याने एका वर्षाचा करार केला आहे, तसेच आघाडीपटू मुसाब अव शाक्सी यानेही अल सीब क्लबशी करार केला आहे. याव्यतिरिक्त अनुभवी खेळाडू मुहम्मद अल मुसाल्लमी, अली अल बुसैदी, तमिम अल बलुशी, अहमद अल रवाही, झहेर अल अघबारी, मुतासिम अव वहैबी या खेळाडूंच्या करारात वाढ करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com