fire gun explodes during celebration Dainik Gomantak
देश

Viral News: सेलिब्रेशन पडलं महागात! केक कापण्यापूर्वीच हातात फायर गन फुटली, तरुणीची मान अन् केस जळाले

Birthday celebration fire gun blast: आजकाल वाढदिवस असो वा लग्नकार्य, सेलिब्रेशनमध्ये वेगळेपण आणण्यासाठी 'पायरो इफेक्ट्स' म्हणजेच फटाक्यांच्या गन, स्मोक बॉम्ब आणि स्पार्कल मशीन वापरण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

Sameer Amunekar

आजकाल वाढदिवस असो वा लग्नकार्य, सेलिब्रेशनमध्ये वेगळेपण आणण्यासाठी 'पायरो इफेक्ट्स' (Pyro Effects) म्हणजेच फटाक्यांच्या गन, स्मोक बॉम्ब आणि स्पार्कल मशीन वापरण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परंतु, अनेकदा या शोबाजीच्या नादात सुरक्षेच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते आणि हीच निष्काळजीपणा एखाद्या मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरते. अशीच एक अंगावर काटा आणणारी घटना एका वाढदिवसाच्या पार्टीत घडली आहे. पार्टीमध्ये वापरण्यात आलेली 'फायर गन' अचानक हातातच फाटल्यामुळे एका तरुणीचा वाढदिवस रुग्णालयाच्या खाटेवर साजरा करण्याची वेळ आली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गाण्यांच्या तालावर डान्स सुरू असतानाच झाला घात

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील तरुणीचे नाव सिमरण असून ही घटना तिच्याच वाढदिवसाच्या पार्टीतील आहे. सिमरण आपल्या कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत अतिशय आनंदात वाढदिवस साजरा करत होती.

केक कापण्यापूर्वी ती गाण्याच्या तालावर हातात फायर गन घेऊन डान्स करत होती. पार्टीत रंगत आणण्यासाठी तिने ती गन ऑन केली. सुरुवातीला त्यातून सुंदर ठिणग्या बाहेर पडू लागल्याने सर्वजण टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करत होते. मात्र, हा आनंद काही सेकंदच टिकला. अचानक एक मोठा आवाज झाला आणि ती फायर गन सिमरणच्या हातातच ब्लास्ट झाली.

पार्टीत एकाएकी पसरली घबराट

हा स्फोट इतका अचानक आणि भयानक होता की तिथल्या संगीताचा आवाज क्षणात किंकाळ्यांमध्ये बदलला. काही कळण्याच्या आतच सिमरणच्या अंगावर आगीच्या ज्वाळा पसरल्या. हे पाहताच तिथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांची एकच धावपळ उडाली. काही मित्रांनी आणि कुटुंबीयांनी तात्काळ सिमरणच्या दिशेने धाव घेत तिच्या अंगावरील आग विझवण्याचा प्रयत्न केला. आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण काही पळांतच भीती आणि तणावामध्ये बदलले.

मान आणि कान गंभीररित्या झुलसले

या भयानक अनुभवानंतर सिमरणने स्वतः सोशल मीडियावर दोन व्हिडिओ शेअर करत या अपघाताची माहिती दिली आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये अपघाताचा तो थरार दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिने स्वतःला झालेल्या जखमा दाखवल्या आहेत.

या स्फोटामुळे सिमरणची मान आणि कान गंभीररित्या भाजले असून तिचे केसही जळून खाक झाले आहेत. सुदैवाने, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तत्परता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि सिमरणचा जीव वाचला. हा व्हिडिओ पाहून नेटकरी चिंता व्यक्त करत असून अशा धोकादायक वस्तूंच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT