Viral Video Food Delivery Boy Dainik Gomantak
देश

Viral Video: डिलिव्हरी बॉयने सिग्नलवरच ग्राहकाचे पार्सल खाल्ले? नेटकरी एकमेकांशी भिडले

Viral Video: एका व्हायरल व्हिडिओमध्ये डिलिव्हरी बॉय ग्राहकाचे अन्न खाताना दिसत आहे. यानंतर अनेकांनी यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Ashutosh Masgaunde

Viral Video Food Delivery Boy Eating Customers Food: एका व्हायरल व्हिडिओमध्ये फूड डिलिव्हरी बॉय ग्राहकाचे अन्न खाताना दिसत आहे. प्राऊड टू बी इंडियन नावाच्या फेसबुक अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून, यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. इंटरनेट यूजर्स यावरून एकमेकांशी वाद घालत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये डिलिव्हरी बॉय ट्रॅफिक सिग्नल सुटण्याची वाट पाहत असताना त्याने अचानक डिलिव्हरी बॉक्समध्ये हात घातला.

त्यानंतर त्याने त्यातून काहीतरी काढून तोंडात टाकले. त्याच ट्रॅफिक पॉईंटवर उभ्या असलेल्या कोणीतरी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.

इंटरनेटवरव्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी या डिलिव्हरी बॉयवर ग्राहकाचे अन्न खात असल्याबद्द कारवाई करण्याची मागणी केली आहे.

असे असले तरी काही लोक म्हणत आहेत तो डिलिव्हरी बॉय त्याचे स्वताचे अन्नही खात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कंपनीने या प्रकरणाची खात्री केल्याशिवया कोणतीही कारवाई करू नये असे अनेकजन म्हणत आहेत.

या संपूर्ण प्रकरणावर काही इंटरनेट यूजर्सने सामंज्यसाची भूमिका घेत, तो डिलिव्हरी बॉय ग्राहकांचे अन्न खात नसून त्याचा डबा असल्याचे स्पष्टकरण दिले.

एक यूजर म्हणाल,

"फूड डिलिव्हरी सिस्टिम पूर्णपणे ऑनलाइ आहे. ज्यावेळी हे अन्न पार्सलसाठी पाठवले जाते त्यावेळी ते पूर्णपणे पॅक करून पाठवले जाते. तसेच ग्राहकही ते पॅक आहे की नाही याची खात्री करून ते पार्सल स्वीकारत असतो."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lawrence Bishnoi: मोठी बातमी! कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सात जणांना गोवा पोलिसांनी घेतले ताब्यात

Kerala Cricket League: 10 चौकार, 18 षटकार! संजू सॅमसनलाही सोडले मागे, केरळ क्रिकेट लीगमध्ये विष्णू विनोदचे 'तूफान'

Ganesh Chaturthi: 'या' वेळेत करा गणरायाची प्रतिष्ठापना! सुख, समृद्धी, ऐश्वर्याने भरेल घर; जाणून घ्या कारण

Viral Video: डोक्यावर पट्टी अन् तुटलेला हात घेऊन फलंदाजी... क्रिकेट वेड्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Bajrang Dal Goa: 'ईद दिवशी जुलूसला परवानगी नको, कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास आम्ही जबाबदार नाही'! बजरंग दलाचा इशारा

SCROLL FOR NEXT