Lok Sabha Membership Of Rahul Gandhi: तोफ पुन्हा धडाडणार! राहुल गांधींना खासदारकी बहाल

Rahul Gandhi:सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देताना म्हटले होते की, ट्रायल कोर्टाने जास्तीत जास्त शिक्षा देण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही.
Lok Sabha Membership Of Rahul Gandhi Restored
Lok Sabha Membership Of Rahul Gandhi RestoredDainik Gomantak
Published on
Updated on

Lok Sabha Secretariat restores membership of Wayanad MP Rahul Gandhi:

'मोदी' आडनाव टिप्पणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (4 ऑगस्ट) वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल केले.

मार्च 2023 मध्ये त्यांना खासदार म्हणून अपात्र घोषित करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावाबद्दल केलेल्या टिप्पण्यांनंतर मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर मे महिन्यात राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले होते.

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे एका सभेत गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना म्हटले होते की, सर्व चोरांचे आडनाव 'मोदी' कसे आहे?

Lok Sabha Membership Of Rahul Gandhi Restored
Chandrayaan-3 च्या नजरेतून चंद्राचे पहिले दर्शन, नासाने शेअर केला व्हिडिओ

शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने या शिक्षेला स्थगिती देताना म्हटले होते की, ट्रायल कोर्टाने जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही. अंतिम निकाल येईपर्यंत दोषी ठरवण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याची गरज आहे.

अपात्रतेचा परिणाम केवळ व्यक्तीच्या अधिकारांवरच नाही तर मतदारांवरही होतो, असे न्यायमूर्तींनी म्हटले होते.

Lok Sabha Membership Of Rahul Gandhi Restored
Viral Video: टोल कर्मचाऱ्याला कारचालकाने चिरडले

या निर्णयामुळे आता राहुल गांधींचा आत्मविश्वास आणखी वाढणार आहे. आधी भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) आणि आता संसद सदस्यत्व बहाल केल्याने त्यांची ताकदही निश्चितच वाढली आहे.

राहुल गांधी आज संसदेत केंद्र सरकारवर निशाणा साधू शकतात. राहुल गांधींना पुन्हा संसद सदस्यत्व बहाल केल्याने संपूर्ण INDIA आघाडीमध्ये उत्साह दिसून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com