डॉक्टरांनी मृत घोषित केलेले भाजप नेते घरी आणल्यानंतर झाले जिवंत

रुग्णालयातील डॉक्टरांनी या नेत्याला मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना घरी आणले होते. अर्ध्या तासानंतर या नेत्याच्या शरीराची हालचाल दिसल्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात नेले.
BJP Leader Mahesh Baghel Declared Dead By Doctors Found Alive
BJP Leader Mahesh Baghel Declared Dead By Doctors Found AliveDainik Gomantak
Published on
Updated on

BJP Leader Mahesh Baghel Declared Dead By Doctors Found Alive:

भारतीय जनता पक्षाचे नेते महेश बघेल यांची उत्तर प्रदेशातील त्यांच्या घरी प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, रुग्णालय प्रशासनाने त्यांना मृत घोषित केले.

रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या मृत्यू झाल्याची खात्री केल्यानंतर, महेश बघेल यांच्या कुटुंबीयांनी त्यांना घरी आणले जेथे त्यांना अर्ध्या तासानंतर त्यांच्या शरीरात हालचाल दिसली आणि नंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात नेले.

रुग्णालयात पोहोचल्यानंतर ते पुन्हा जिवंत असल्याचे दिसून आले. त्यांना जिवंत पाहून नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

BJP Leader Mahesh Baghel
BJP Leader Mahesh BaghelDainik Gomantak

नातेवाईक आनंदित झाले

महेश बघेल यांच्या कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार, पुष्पांजली रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर, त्यांना सराई ख्वाजा येथील त्यांच्या निवासस्थानी आणले.

मृत्यूने शोक व्यक्त करणाऱ्या नातेवाईकांच्या अचानक लक्षात आले की बघेल यांनी डोळे उघडले आणि त्यानंतर त्यांच्या शरीरात हालचाल झाली.

हालचाल पाहून नातेवाईकांनी बघेल यांना न्यू आग्रा (Agra) येथील रुग्णालयात नेण्याच आले. आता त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

BJP Leader Mahesh Baghel Declared Dead By Doctors Found Alive
Lok Sabha Membership Of Rahul Gandhi: तोफ पुन्हा धडाडणार! राहुल गांधींना खासदारकी बहाल

बघेल यांचा भाऊ लखन सिंग बघेल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत आणि आता ते बरे आहेत. त्यांच्या छातीत जंतुसंसर्ग झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

BJP Leader Mahesh Baghel Declared Dead By Doctors Found Alive
Chandrayaan-3 च्या नजरेतून चंद्राचे पहिले दर्शन, नासाने शेअर केला व्हिडिओ

महेश बघेल यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर (Social Media) पसरली त्यानंतर शोक संदेशांचा वर्षाव झाला आणि लोकांनी या नेत्याला श्रद्धांजली वाहिली.

महेश बघेल जिवंत असल्याचे कळताच अनेकजन ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com