Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: लग्नासाठी घरचे तयार नाही झाले तर काय कराल? पठ्ठ्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Social Media Viral Video: सोशल मीडियावर स्क्रोल करताना अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात, ज्यात काही लोक यूट्यूबरला किंवा ब्लॉगरला मुलाखत देताना दिसतात.

Manish Jadhav

Social Media Viral Video: सोशल मीडियावर स्क्रोल करताना अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात, ज्यात काही लोक यूट्यूबरला किंवा ब्लॉगरला मुलाखत देताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये एका यूट्यूबर मुलीने विचारलेल्या प्रश्नावर काही मुलांनी असे उत्तर दिले की, ते ऐकून सर्वजण थक्क झाले.

आधी हा व्हिडिओ पाहा!

दरम्यान, हा व्हिडिओ (Video) इंस्टाग्रामवर @naughtyworld नावाच्या हँडलने शेअर केला. व्हिडिओमध्ये मुलाखत घेणारी मुलगी आधी मुलींच्या एका ग्रुपकडे जाते आणि त्यांना प्रश्न विचारते की, 'जर तुमच्या लग्नासाठी आई-वडील नाही तयार झाले तर तुम्ही काय कराल? त्यांना मनवाल की पळून जाऊन लग्न कराल?' यावर पहिल्या मुलीने असे उत्तर दिले की, 'मी पळून जाऊन लग्न करेन.' तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलीने 'माझे आई-वडील मानतीलच' असे उत्तर दिले.

मुलांचे उत्तर ऐकून यूट्यूबरचा चेहरा पडला

दरम्यान, जेव्हा या प्रश्नाची पाळी मुलांवर आली तेव्हा यूट्यूबर मुलीने तोच प्रश्न त्यांना विचारला. मुलांनी दिलेले उत्तर खरोखरच कौतुकास्पद होते. ते म्हणाले, "आम्ही पळून जाऊन लग्न करणार नाही. सर्वात आधी आई येते, त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचा नंबर लागतो." हे उत्तर ऐकून मुलाखत घेणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावरील हास्य पूर्णपणे गायब झाले. मुलांनी दिलेले हे उत्तर सोशल मीडियावरील अनेकांना विचार करायला लावणारे ठरले.

नेटकऱ्यांकडून जोरदार कौतुक

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला. मुलांचे हे उत्तर ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यांचे तोंडभरुन कौतुक केले. एका यूजरने लिहिले, 'या मुलांसाठी खूप आदर आहे.' दुसऱ्या यूजरने लिहिले, 'सगळ्यात आधी आई आहे, नंतरच दुसरी बाई, हेच एक खरा पुरुष म्हणतो.' तिसऱ्या यूजरने लिहिले, 'मजबूत पुरुष जन्माला येत नाहीत, तर ते तयार होतात.' तर, आणखी एका यूजरने लिहिले की, 'आईसाठी सर्व काही....'

हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तूफान व्हायरल होत असून मुलांनी दिलेल्या उत्तराचे मोठ्या प्रमाणावर समर्थन केले जात आहे. मुलांचे हे उत्तर त्यांची मानसिकता आणि कौटुंबिक मूल्यांवरचा विश्वास दर्शवते. हा व्हिडिओ पाहून अनेकांना त्यांच्या आयुष्यातील प्राधान्यक्रमांचा विचार करण्यास भाग पाडले.

Shri Saptakoteshwar: शिवरायांनी जीर्णोद्धार केलेल्या ‘सप्तकोटीश्वर’चा इतिहास उलगडणार, पर्यटन खात्याकडून चित्रपटाची निर्मिती

Goa Shack Policy: शॅक्सच्या ‘सबलेटिंग’ प्रकरणांचा पुनर्विचार होणार! मंत्री खंवटेंनी दिली माहिती; 23 परवान्यांचे होणार नूतनीकरण

GCA: 'गोवा क्रिकेट'ची धुरा कुणाच्या हातात राहणार? निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष; 5 जागांसाठी दुहेरी चुरस

Goa Live Updates: अनमोड घाट रस्ता सहाचाकींसाठी खुला

Goa News: '..हा अपघात नाही घातपात'! बार्रेटो मृत्‍यूप्रकरणी आईकडून शंका; न्यायासाठी राष्‍ट्रपती, पंतप्रधानांकडे साकडे

SCROLL FOR NEXT