
सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा व्हिडिओ जोरदार चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये ती मुलगी रेल्वेच्या एसी कोचमध्ये सिगारेट ओढताना आणि त्यावरून प्रवाशांशी वाद घालताना दिसत आहे. ट्रेनमधील इतर प्रवाशांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर संपूर्ण प्रसंग गोंधळात बदलला.
आजही अनेकांना रेल्वे प्रवास आवडतो कारण तो संस्मरणीय आणि किफायतशीर मानला जातो. पण बऱ्याचदा अशा प्रवासात छोट्या–छोट्या कारणांमुळे वाद निर्माण होतात. याच प्रकारचा प्रसंग या व्हिडिओतून समोर आला आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की मुलगी एका सीटवर बसलेली आहे. एका हातात फोन घेऊन ती बोलत आहे, तर दुसऱ्या हातात जळती सिगारेट आहे. प्रवासी तिला कोचबाहेर जाऊन धूम्रपान करण्यास सांगतात, मात्र ती नकार देते.
एवढंच नाही तर कोणी तिचा व्हिडिओ शूट करत असल्याचे तिला लक्षात येताच, चर्चेचा मुद्दा सिगारेटवरून व्हिडिओ शूट करण्याकडे वळतो. वाद आणखी वाढतो. ती तरूणी लोकांसोबत वाद घालत असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय.
हा व्हिडिओ सर्वप्रथम X (पूर्वी ट्विटर) प्लॅटफॉर्मवर @Mahtoji_007 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला.
यानंतर रेल्वे सेवेकडून लगेच प्रतिसाद देण्यात आला असून, त्यांनी या घटनेचा तपशील विचारला आहे. हा व्हिडिओ सध्या हजारोंच्या संख्येने पाहिला जात असून, सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा रंगली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.