Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: प्री-वेडिंगसाठी रोमँटिक पोझ देणाऱ्या कपलचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "समुद्रकिनाऱ्यावर जॉन सीनासोबत द रॉक!"

Couple Viral Video: आजकाल सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले जातात. काही व्हिडिओ असे असतात, जे वेगळे असल्यामुळे लोकांचे लक्ष वेधून घेतात.

Manish Jadhav

Couple Viral Video: आजकाल सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले जातात. यापैकी काही व्हिडिओ असे असतात, जे वेगळे असल्यामुळे लोकांचे लक्ष वेधून घेतात आणि ते व्हायरलही होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ एका कपलच्या प्री-वेडिंग फोटोशूटचा (Photoshoot) असून त्यातील शेवट पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसले?

सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ (Video) खूप छोटा आहे, पण त्याचा शेवट खूपच मजेशीर आहे. हा व्हिडिओ एका समुद्रकिनाऱ्यावरील आहे, जिथे एक जोडपे त्यांचे प्री-वेडिंग फोटोशूट करत आहे. व्हिडिओमध्ये आधी मुलगी हळू चालत पुढे जाते आणि नंतर मागे वळून मुलाला तिच्याकडे येण्यास खुणावते. मुलगा तिच्याकडे धावत जातो, तिला कमरेत पकडून उचलतो आणि गोल गोल फिरु लागतो. पण याचवेळी एक अनपेक्षित घटना घडते.

वाळूत पाय रुतल्यामुळे मुलाचा तोल जातो आणि रोमँटिक पोझ देण्याचा संपूर्ण क्षण बिघडतो. मुलगा आणि मुलगी दोघेही त्याच ठिकाणी खाली पडतात. त्यांच्या या अनपेक्षित पडण्यामुळे संपूर्ण मोमेंट खराब होते आणि व्हिडिओमध्ये एक विनोदी ट्विस्ट येतो.

व्हिडिओला मोठी पसंती

हा व्हिडिओ 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @JeetN25 नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये मजेशीरपणे लिहिले, "प्री-वेडिंग शूट WWE बनले." ही बातमी लिहिपर्यंत हा व्हिडिओ 60 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले, "भारतातले अर्धे लोक वेडेच झाले आहेत." दुसऱ्या एका यूजरने लिहिले, "समुद्रकिनाऱ्यावर जॉन सीनासोबत द रॉक!" आणखी एका युजरने, "प्री-वेडिंग भविष्यासाठी खूपच अवघड वेडिंग बनली आहे," अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, व्हिडिओमुळे हे सिद्ध होते की काही वेळा आपण जे ठरवतो, त्यापेक्षा वेगळेच काहीतरी घडते. आणि हेच अनपेक्षित क्षण कधीकधी सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय ठरतात. सध्याच्या काळात जिथे प्रत्येकजण परफेक्ट आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, तिथे असे व्हिडिओ लोकांना अधिक आकर्षित करतात, कारण ते जीवनातील वास्तव आणि अनपेक्षित घटनांचे प्रतिनिधित्व करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VHT 2025-26: विजय हजारे ट्रॉफीचा थरार! मुंबई-दिल्लीसह 8 संघ सज्ज; पाहा उपांत्यपूर्व फेरीचं संपूर्ण वेळापत्रक

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

Madhav Gadgil: पर्यावरणाचा प्रखर प्रहरी, पश्चिम घाटांचे शिल्पकार डॉ. माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड

Vijay Hazare Trophy: गोव्याची झुंज अपयशी! 'विजय हजारे ट्रॉफी'त महाराष्ट्राचा 5 धावांनी विजय, ऋतुराजची शतकी खेळी पडली 'महागात'

eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

SCROLL FOR NEXT