Abundant Jamun Fruit Drought Myth Dainik Gomantak
देश

Viral News: मुबलक जांभळे म्हणजे 'दुष्काळाची चाहूल'? सोशल मीडियावर मेसेज होतोय व्हायरल, तज्ज्ञांनी दिलं स्पष्टीकरण

Abundant Jamun Fruit Drought Myth: सोशल मीडियावर एक संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, ‘मुबलक जांभळे म्हणजे दुष्काळाची चाहूल’ असा दावा त्यात केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

प्रशांत भरवीरकर

नाशिक: यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर जांभळे आलेली आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, ‘मुबलक जांभळे म्हणजे दुष्काळाची चाहूल’ असा दावा त्यात केला आहे.

पूर्वीही ‘जांभळाचे सडे म्हणजे दुष्काळाच्या झळा’ अशी समजूत होती. मात्र, वनस्पतीशास्रज्ञ, संशोधकांच्या मते ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून त्यामागे हवामानविषयक कारणे, भूजलपातळी खालावल्याने झाडांकडून होणारी ही प्रतिक्षिप्त क्रिया असल्याचे सांगण्यात आले.

यंदाच्या जांभळाची झाडे फळांनी अक्षरशः लगडलेली दिसत आहेत. अनेक ठिकाणी जांभळांचे सडे पडल्याचे चित्र आहे. ज्येष्ठ नागरिक सांगतात की, अनेक वर्षांत त्यांनी इतकी जांभळे कधीच पाहिली नव्हती.

त्याचअनुषंगाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या संदेशात, जांभळासारख्या खोलवर जाणाऱ्या सोटमूळ असलेल्या झाडाला इतकी फळे येणे म्हणजे ते झाड ‘आत्महत्या’ करत असल्याचा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. पुढे येणाऱ्या कठीण काळात आपली जनुके टिकून राहावीत म्हणून जांभूळ अधिकाधिक ऊर्जा फळे अर्थात बिया तयार करण्यासाठी वापरत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

हवामानात मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळतात, तेव्हा झाड ‘बचावात्मक मोड’मध्ये जाते. स्वतःला वाचवण्याऐवजी आपली प्रजाती टिकून राहावी म्हणून झाड संपूर्ण ऊर्जा बिया अर्थात फळे तयार करण्यासाठी वापरते.

- डॉ. आशिष जगताप, वनस्पती संशोधक

जांभूळ अधिक का येते?

हवामान बदलाचे परिणाम, अधिक काळ सूर्यप्रकाश आणि वाढलेले तापमान यांचा जांभळाच्या फळधारणेवर सकारात्मक परिणाम होत असल्याची माहिती तज्ज्ञ देतात. उन्हाळा अधिक तापला, आकाश निरभ्र राहिले आणि सूर्यप्रकाश मुबलक मिळाला, तर जांभळाची फळधारणा वाढते.

अवकाळी पाऊस कमी झाला, वादळी वाऱ्यांचा तडाखा बसला नाही, तर उत्पादन अधिक होते. पावसाळा लांबल्यास फळधारणेचा कालावधीही वाढू शकतो, असे जांभूळ पिकांच्या अभ्यासकांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Income Tax Return: 31 जुलैची मुदत वाढणार का? आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर जल्लोष! ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए…’,म्हणत अभिजीत दीपकेची टोलेबाजी VIDEO

Dharmendra Pradhan Resigns: सीजेपी आंदोलनापुढे अखेर मोदी सरकार झुकले! धर्मेंद्र प्रधान यांनी दिला केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा

Dona Paula Car Accident: वाहन पार्किंगचा हलगर्जीपणा चालकाला पडला महागात! उतारावरून गाडी थेट गॅरेजमध्ये, आलिशान वाहनाला धडक

Goa Farmers Fertilizer Mobile App: खत खरेदीसाठी 'ऑफलाइन' पर्यायही हवा; ॲप अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर क्रूझ सिल्वा यांची टीका

SCROLL FOR NEXT