Agnipath' Protests: Trains Set On Fire Dainik Gomantak
देश

अग्निपथ योजनेवरुन उत्तर प्रदेशात आंदोलकांनी चार बोगी जळल्या

दरभंगाहून नवी दिल्लीला जाणाऱ्या बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेसला समस्तीपूरमध्ये लागली आग

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकारने तीन दिवसापूर्वी घोषित केलेल्या 'अग्निपथ' घोषणेला विरोध करण्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी नागरिकांकडून निदर्शने सुरु आहेत. यातील निदर्शनांमध्ये बहूतांशी ठिकाणी जमावाने हिंसक होत जाळपोळ केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज तीसऱ्या दिवशी ही उत्तर प्रदेशात आंदोलकांकडून जाळपोळ सुरुच असून उत्तर प्रदेशातील बलिया येथे जमावाने ट्रेन पेटवल्याची घटना समोर आली आहे. (Violence continues in Uttar Pradesh over Agnipath scheme )

मिळालेल्या माहितीनुसार दरभंगाहून नवी दिल्लीला जाणाऱ्या बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेसला समस्तीपूरमध्ये आग लागली. त्यामुळे रेल्वेच्या चार बोगी जळून राख झाल्या. याचा फायदा उठवत चोरट्यांनी ट्रेनची तोडफोड आणि लुटमार केल्याचं ही स्पष्ट झाले आहे. समस्तीपूर-मुझफ्फरपूर रेल्वे सेक्शनच्या भोला टॉकीज रेल्वे गुमटीजवळ ही घटना घडली. बलिया हे बिहार सीमेवर आहे. जमावाने या स्थानकावरील इतर गाड्यांचीही तोडफोड केली.

या तोडफोडीमध्ये दुकाने आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान केले जात आहेत. यावर पोलीसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. निदर्शनांनी उग्र रुप धारण केले असले तरी याचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन कामांवर ही होत असला तरी सकाळपासूनच विद्यार्थी रस्ते आणि रेल्वे रुळांवर उतरून गोंधळ घालू लागले आहेत.

या योजनेबाबत युवकांनी माध्यमांशी बोलताना विचारले प्रश्न

"आम्ही सशस्त्र दलात भरती होण्यासाठी कठोर मेहनत घेतो. 4 वर्षे सेवा कशी असेल, किती महिने प्रशिक्षण आणि रजा कशी घ्यायची ? अवघ्या 3 महिन्यांच्या प्रशिक्षणावर आम्ही देशाचे संरक्षण कसे करणार ? सरकारला ही योजना परत घ्यावी लागेल," असे मत संतप्त तरुणांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT