प्रेषित मुहम्मद यांच्यावरील वक्तव्यावर आक्षेप घेणाऱ्या देशांमध्ये अमेरिकाही सामील झाला आहे. गुरुवारी अमेरिकेने 'भारतीय जनता पक्षाच्या दोन अधिकाऱ्यांच्या' वक्तव्याचा निषेध केला. त्याचबरोबर या प्रकरणी त्यांनी भाजपने केलेल्या कारवाईचेही कौतुक केले आहे. विशेष म्हणजे याआधी अनेक अरब देशांनी मुहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल निषेध नोंदवला आहे. (The United States has condemned the controversial remarks made by Prophet Muhammad)
यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले, "भाजपच्या (BJP) दोन पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो. त्याचबरोबर पक्षाने त्या वक्तव्यांचा जाहीर निषेध केल्याचे पाहून आम्हाला आनंद होत आहे."
काय प्रकरण होते
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी 26 मे रोजी प्रेषित मुहम्मद यांच्यावर वादग्रस्त केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक इस्लामिक देशांनी यावर नाराजी व्यक्त केली. यामध्ये अनेक अरब देश होते ज्यांचे भारताशी (India) संबंध जवळचे मानले जातात. बांगलादेशातील निदर्शकांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडून औपचारिक निषेधाची मागणी केली.
अमेरिकेपूर्वी (America) कतार, इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया, पाकिस्तानसह अनेक इस्लामिक देशांनी पैगंबरावरील वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या शर्मांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यावर अनेक ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.