View of Sudarshan Setu inaugurated by PM Modi, viral video:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील द्वारका येथे भारतातील सर्वात लांब केबल पुलाचे उद्घाटन केले. ओखा आणि बायत द्वारका बेटांना जोडणारा 'सुदर्शन सेतू' 979 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे.
PM मोदींनी ऑक्टोबर 2017 मध्ये 2.3 किमी लांबीच्या पुलाची पायाभरणी करताना म्हटले होते की, हा पूल जुन्या आणि नवीन द्वारकामधील दुवा म्हणून काम करेल.
आता हा पूल तयार झाला असून आज लोकांसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलाचे हवाई दृश्य अतिशय विलोभनीय आहे.
चौपदरी 27.20 मीटर रुंद पुलाच्या दोन्ही बाजूला 2.50 मीटर रुंद पदपथ आहेत. भगवद्गीतेतील श्लोक आणि दोन्ही बाजूंना भगवान कृष्णाच्या प्रतिमांनी सुशोभित फूटपाथसह सुदर्शन सेतू सजला आहे.
'सिग्नेचर ब्रिज' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुलाचे नाव बदलून 'सुदर्शन सेतू' असे करण्यात आले आहे.
या 2.3 किलोमीटर लांबीच्या सुदर्शन पुलामुळे बायत-द्वारका गाठणे आणखी सोपे होणार आहे. याशिवाय, पूल अशा प्रकारे डिझाइन केला आहे की तो कृष्णाच्या भक्तीचा वाहक म्हणून देखील पाहिला जाईल.
विशेष म्हणजे पुलाचे तोरण कृष्णाच्या मूर्तीच्या आकाराचे आहेत. तसेच त्यांच्यावरील मोराची पिसे रात्रंदिवस भाविकांना आकर्षित करतील. पुलाच्या वाटेवर गीतेचा भावार्थ लिहिला आहे. एवढेच नाही तर येथे भगवान विष्णूची सात नावेही लिहिली आहेत.
बायत द्वारका हे ओखा बंदराजवळील एक बेट आहे, जे द्वारका शहरापासून ३० किमी अंतरावर आहे. भगवान श्रीकृष्णाचे प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर येथे आहे.
जवळच असलेल्या एका मोठ्या सभेला संबोधित करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी द्वारकाधीश मंदिरात पूजा केली. यानंतर पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी शहरात मेगा रोड शो करणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.