Thief stuck in exhaust fan hole Dainik Gomantak
देश

VIDEO: एक्झॉस्ट फॅनसाठी केलेल्या छिद्रात अडकला चोरटा; घरमालकानं पोलिस बोलवल्यानंतर रंगलं रेस्क्यु ऑपरेशन Watch

Viral Video: चोरट्याने घरात प्रवेश करण्यासाठी एक्झॉस्ट फॅनसाठी केलेल्या छिद्राचा पर्याय निवडला अन् तोच त्याच्या अंगलट आला.

गोमंतक ऑनलाईन टीम

राजस्थान: घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन चोरी करण्याचा प्लॅन चोरट्याने केला खरा पण, तो प्लॅन त्याच्या अंगलट आल्याची घटना घडली. घरात प्रवेश करण्यासाठी चोरट्याने एक्झॉस्ट फॅनसाठी केलेल्या छिद्राचा वापर केला पण, त्याचा छिद्रात तो अडकून पडला अन् त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी बोलवावे लागले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कोटा, राजस्थान येथील एका घरातील कुटुंब खाटू श्याम यांच्या दर्शनासाठी बाहेर गेले होते. घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन चोरट्याने हात साफ करण्याचा प्लॅन केला. पण, घरात प्रवेश करण्यासाठी त्याने एक्झॉस्ट फॅनसाठी केलेल्या छिद्राचा पर्याय निवडला अन् तोच त्याच्या अंगलट आला. चोरट्याने छिद्रात प्रवेश केला खरा पण, तिथेच तो अडकून पडला.

घरमालक घरातील सर्व सदस्यांसह घरात आले त्यावेळी त्यांनी छिद्रात अडकून पडलेला चोरटा दिसला. घरमालकाने तात्काळ या घटनेची पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्याला सुरुवात केली.

चोरटा छिद्रात फारकाळ अडकून पडल्याने त्याच्या शरीरात त्राण उरले नव्हते मात्र, त्याची बाहेर पडण्यासाठी धडपड सुरुच होती. पोलिसांनी अखेर त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

पोलिसांच्या मदतीने अखेर या चोरट्याला एक्झॉस्ट फॅनच्या छिद्रातून बाहेर काढण्यात यश आले. चोरटा एका पोलिस कर्मचाऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी सध्या या चोरट्यावर प्रथमोपचार करुन चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पोलिस घटनेचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

...तर गोमंतकीयांना 10 लाखांचा आरोग्य विमा; 2027ला सत्तेत आल्यास 'मुख्यमंत्री सेहत' योजने'ची तत्काळ अंमलबजावणी, आतिषी यांची घोषणा

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची तयारी; गोवा सरकारची घोषणा मोठी, पण अंमलबजावणी सोपी नाही

VIDEO: लाईव्ह सामन्यात कुत्र्याचा धुमाकूळ! चेंडू घेत पळाला अन्... पाहा व्हिडिओ

Ajit Pawar: खासदारकी सोडून महाराष्ट्रात रमले अन् अखेरपर्यंत राज्याचं राजकारण गाजवलं; 'दादा' नावाचं वादळ शांत झालं!

Goa Crime: लोखंडी सळईने मारहाण, शिवीगाळ अन् धमकी; दोन सख्ख्या भावांवर टोळक्याकडून जीवघेणा हल्ला, सांकवाळ हादरलं

SCROLL FOR NEXT