Indigo Flight Dainik Gomantak
देश

Indigo Flight: इंडिगो क्रू मेंबर अन् प्रवासी यांच्यातील वादाचा व्हिडीओ व्हायरल, तपास सुरु

Indigo Flight: सध्या इंडिगो फ्लाइट मधील क्रू मेंबर आणि त्या फ्लाईटमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशामध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

Indigo Flight: सध्या इंडिगो फ्लाइट मधील क्रू मेंबर आणि त्या फ्लाईटमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशामध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये, इस्तंबूलहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये क्रू मेंबर आणि प्रवासी यांच्यात वाद पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ त्याच फ्लाइटमधून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या एका प्रवाशाने बनवला, जो त्याने नंतर ट्विटरवर पोस्ट केला.

दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना इंडिगोने सांगितले की, 'ज्या प्रवाशासोबत क्रू मेंबरचा वाद झाला, त्याने फ्लाइटमध्ये चढताना गैरवर्तन केले आणि नंतर एअरहोस्टेससोबत गैरवर्तन केले. ज्या क्रू मेंबरसोबत प्रवाशाचा (Passenger) वाद होत होता तो त्या टीमचा लीडर असल्याने त्याला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला.' विमान कंपनीने आणखी एक निवेदन जारी केले असून आम्ही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहोत. आमच्यासाठी, आमच्या "प्रवाशांची" सोय ही आमची प्राथमिकता आहे.

तसेच, ईआर गुरप्रीत सिंग हंस यांनी 19 डिसेंबर रोजी एका ट्विटमध्ये लिहिले की, "दुर्दैवाने" मी इंडिगोच्या फ्लाइटचे तिकीट बुक केले.' हंसने आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, 'मी माझ्या डोळ्यांनी पाहिले की, त्या सहप्रवाशाने त्या मुलीशी जेवणावरुन कसे गैरवर्तन केले आणि मग त्या मुलीने त्याला कसे उत्तर दिले.'

दुसरीकडे, विमानात गैरवर्तनाचा हा पहिला व्हिडीओ नाही. यापूर्वी, इंडिगोच्या पायलटला एका महिला (Women) प्रवाशाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) तीन महिन्यांसाठी निलंबित केले होते. आजारी आईसाठी व्हीलचेअर मागितल्याबद्दल पायलटने महिला प्रवाशाला तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली होती. मात्र, या घटनेनंतर विमान कंपन्यांनी वैमानिकाला ड्युटीवरुन हटवले. आता डीजीजीएने पायलटवर कारवाई केली आहे. हे प्रकरण चेन्नई ते बंगळूरुला जाणाऱ्या फ्लाइटचे होते.

शिवाय, सुप्रिया उन्नी नायरने बंगळूरु विमानतळावर उतरल्यानंतर तिच्या 75 वर्षीय आजारी आईसाठी व्हीलचेअरची मागणी केली होती, त्यानंतर पायलटने तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिला तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. सुप्रिया उन्नीने ट्विट करुन आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तनाची माहिती दिली होती. तिने सांगितले की, माझी आई मधुमेहाची रुग्ण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT