Madhya Pradesh| Video Dainik Gomantak
देश

Cheetah Video: कुनो नॅशनल पार्कमधून आली गुड न्यूज; मादी चित्ताने दिला 4 बछड्यांना जन्म

मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमधुन एक गुड न्युज समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Madhya Pradesh: मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्मधुन एक गुड न्युज समोर आली आहे. या पार्कमदील सिया या मादीने चार चित्त्यांना जन्म दिला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. मादी चित्ता आणि चार लहान पाहुणे सुकरुप आहेत.

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी या चार पाहुंण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हे लहान चित्ते वाळलेल्या गवताच्या मध्यभागी बसलेले दिसत आहेत.

  • भारताच्या चित्ता प्रकल्पाला मोठे यश

दक्षिण आफ्रिकन (South Africa) देशांतून भारतात (India) आणलेल्या या चित्त्यांमुळे देशाच्या 'चित्ता प्रकल्प'ला मोठे यश मिळाले आहे. 

कुनोचे डीएफओ पीके वर्मा यांनी सांगितले की, कुनोचा बाडा क्रमांक चार आणि पाच जोडलेले आहेत. तीन वर्षांची मादी चित्ता सियासा पाच नंबरच्या परिसरात राहत होती. 

त्याच वेळी नर चित्ता फ्रेडी आणि एल्डन बंधूंना चार क्रमांकाच्या एन्क्लोजरमध्ये ठेवण्यात आले होते. अशी शक्यता आहे की मादी चित्ताने एल्डन किंवा फ्रेडीशी मिलन केले, त्यानंतर या पिल्यांचा जन्म झाला. 

मादी सियाने 24 मार्च रोजीच या चार बछड्यांना जन्म दिला होता. परंतु कुनो व्यवस्थापनाला बुधवारी म्हणजेच आज याची माहिती मिळाली आहे.आण

प्रधानमंत्री मोदी यांनी नॅशनल पार्कला दिली होती भेट

पंतप्रधान मोदींनी (PM Modi) आपल्या 72 व्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशला खास भेट दिली होती. मोदींनी मध्ये प्रदेशमदील श्योपुर जिल्हात वसलेल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातुन आणलेले 8 चित्ते सोडले होते. यामध्ये 5 नर आणि 3 मादी होत्या . पण अलिकडेच मादी चित्ता साशाचा मृत्यु झाला आहे.

दुसरीकडे, प्रजाती नामशेष झाल्यानंतर सुमारे सात दशकांनंतर चित्ता भारतात पुन्हा दाखल होत आहेत. देशातील शेवटचा चित्ता 1947 मध्ये सध्याच्या छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात मरण पावला आणि 1952 मध्ये ही प्रजाती भारतातून (India) नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT