Relationship Tips: रिलेशनशिपमध्ये असूनही मुलं गर्लफ्रेंडशी लग्न करणं का टाळतात?

अनेक दिवस एकमेंकांसह रिलेशनशिपमध्ये असुनही मुलं लग्न करण्यास नकार का देतात हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना!
Relationship Tips
Relationship TipsDainik Gomantak

Relationship Tips: प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी खरं प्रेम होतच. प्रेम केल्या जात नाही तर ते होत असतो. परंतु अशी अनेक उदाहरणं आहेत. जे दीर्घकाळापासून एकमेंकांसोबत रिलेशनमध्ये राहूनही ते लग्न करण्यास तयार होत नाही.

बऱ्याच प्रकरणात लग्नाला नकार हा मुलांकडून येत असतो. गर्लफेंडवर जिवापाड प्रेम करणारे तरुण लग्नाला का नकार देतात असा प्रश्न तुम्हालाही कधी तरी पडला असेलच. दीर्घकाळापासून रिलेशनमध्ये (Relationship) राहुनही लग्नाला का नकार देतात.

या प्रश्नाने मुली नैराश्यात जात असतात. प्रत्येक गोष्टी पुर्ण करणारा मुलगा लग्न करण्यास नकार देतो. याची कारणं कोणती हे जाणुन घेउया.

  • चारचौघात रिलेशनशीपबद्दल उघड बोलत नाहीत

अनेक मुलं प्रेम रिलेशनमध्ये असतात. परंतु ते त्यांचे नाते चारचौघात दाखवत नाही. कारण त्यांना समाजाची त्यांना भीती असते. जर तुम्ही रिलेशनमध्ये आहात आणि त्याविषयी गंभीर आहात तर ते नात स्विकारा. समाजाची काळजी करू नका. जर तुम्ही समाजाला घाबरत असाल तर तुम्ही तुमच्या नात्याला न्याय देऊ शकणार नाहीत.

  • आई-वडिलांना रिलेशनबद्दल सांगत नाहीत

अनेक मुलं दीर्घकाळापासून रिलेशनमध्ये असतात. परंतु मुलं त्यांच्या प्रेमाविषयी किंवा त्यांच्या नात्याविषयी घरी सांगत नाहीत. कारण त्यांना घरच्यांची मन राखायचं असते. तसेच संपत्ती, नातेसंबंधाचे हित जपण्याचेही कारण असते.

पण तुम्ही जर दीर्घकाळापासून प्रेम संबंधात आहात तर तुमच्या प्रेयसीला तुमच्या पालकांशी भेटवा. मैत्रिण (Friend) म्हणून तरी तुम्ही तिची भेट आई-वडिलांशी करून देऊ शकतात. पण वारंवार सांगूनही जर तुम्ही तुमच्या प्रेयसीला पालकांना भेटवलं नसेल तर तुमचे रिलेशन धोक्यात येउ शकते.

  • जॉब करणारी मुलगी नको

अनेक मुलं नोकरी (Job) करणाऱ्या मुलीवर प्रेम करू शकतात. पण लग्नानंतर मुलीने काम करू नये असे मुलांना वाटते. त्यामुळे जर प्रेयसी लग्नानंतरही नोकरी करण्याचे म्हणत असेल तर मुलं त्याला नकार देतात आणि नाते संपवत असतात.

  • अरेंज मॅरेज करायची आवड

बरेच मुलं त्यांच्या प्रेम जीवनाबद्दल खूप गोंधळलेले असतात. ते निश्चितपणे एखाद्या मुलीच्या प्रेमात अडकतात, परंतु ते अरेंज मॅरेज करण्यावर भर देतात. लव्ह मॅरेज यशस्वी होउ शकत नाही असे त्यांना वाटते. प्रेयसीसोबत लग्न केल्याने आदर राहणार नाही अशा भीतीपोटीमुळेही अनेक मुलं लग्नास नकार देतात.

बोर होतात

अनेक मुलं हे एकाच व्यक्तीसह दिर्घकाळ सोबत राहुन बोर होतात. यामुळे ते लग्न करण्यास नकार देतात.

  • निर्णय क्षमता नसतं

लग्न करणे हा खुप मोठा निर्णय असतो. प्रत्येक मुलामध्ये हा निर्णय घेण्याची क्षमता नसते. यामुळे अनेक मुलं रिलेशनमध्ये राहुन देखील लग्न करत नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com