Venus Williams  Dainik Gomantak
देश

Record-Breaking Win:टेनिस क्वीन व्हीनस विल्यम्सची कमाल! 22 वर्षांनी लहान खेळाडूला नमवून जिंकला सामना; अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी सर्वात वयस्कर खेळाडू

Venus Williams DC Open 2025: सध्या सुरु असलेल्या डीसी ओपन टेनिस स्पर्धेत 45 वर्षीय व्हीनस विल्यम्सने आपल्यापेक्षा 22 वर्षांनी लहान असलेल्या पीटन स्टर्न्सचा 6-3, 6-4 असा पराभव केला.

Manish Jadhav

Venus Williams DC Open 2025: टेनिस जगतातील महान खेळाडूंपैकी एक आणि एकेकाळी जागतिक क्रमवारीत नंबर-1 स्थानी असलेल्या अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सने (Venus Williams) आपल्या कारकिर्दीत आणखी एक मोठी कामगिरी नोंदवली आहे. सध्या सुरु असलेल्या डीसी ओपन टेनिस स्पर्धेत 45 वर्षीय व्हीनस विल्यम्सने आपल्यापेक्षा 22 वर्षांनी लहान असलेल्या पीटन स्टर्न्सचा 6-3, 6-4 असा पराभव केला. या विजयासह व्हीनस महिला टेनिस एकेरीमध्ये सर्वाधिक वयात सामना जिंकणारी दुसरी सर्वात वयस्कर खेळाडू ठरली.

मार्टिना नवरातिलोव्हा अव्वल स्थानी

महिला टेनिसमध्ये (Tennis) सर्वाधिक वयात एकेरी सामना जिंकण्याचा विक्रम अजूनही मार्टिना नवरातिलोव्हाच्या नावावर आहे. तिने 2004 मध्ये 47 वर्षांची असताना विम्बल्डन स्पर्धेत कॅटालिना कास्टानोचा पराभव करुन हा पराक्रम केला होता.

या ऐतिहासिक विजयानंतर व्हीनस विल्यम्सने सांगितले की, "हे पहिले पाऊल आहे. पहिला सामना नेहमीच खूप कठीण असतो. दीर्घ विश्रांतीनंतर कोर्टवर परतणे अजिबात सोपे नव्हते. हे शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे." तिने पुढे म्हटले, "सामन्यात उतरताना मला माहित होते की माझ्यामध्ये जिंकण्याची क्षमता आहे, पण मला ते जिंकून दाखवावे लागले. त्यामुळे चांगले खेळणे आणि जिंकणे हे सर्वोत्तम आहे."

दुहेरीतही व्हीनसची विजयी सुरुवात

दरम्यान, 16 महिन्यांनंतर टेनिस कोर्टवर पुनरागमन करणाऱ्या व्हीनस विल्यम्सने एकेरीसोबतच दुहेरीच्या (Doubles) प्रकारातही विजयाने सुरुवात केली. दुहेरीच्या पहिल्या फेरीत व्हीनसने हैली बॅप्टिस्टसोबत मिळून जिनी बाउचार्ड आणि क्लर्वी न्गूनू या जोडीचा पराभव केला. आता एकेरीच्या दुसऱ्या फेरीत व्हीनसचा सामना पोलंडच्या (Poland) जागतिक क्रमवारीत 24व्या स्थानावर असलेल्या मॅग्डालेना फ्रेचशी होईल. फ्रेचने पहिल्या फेरीत क्वालिफायर यूलिया स्टारोडुबत्सेवाचा 6-2, 6-4 असा पराभव करुन दुसऱ्या फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; ‘रो-रो’ दुरुस्तीला !

Margao Crime: 'आईचे दागिने करायचे आहेत' म्हणत आला, हातोड्याने केला हल्ला; मडगाव प्रकरणातील संशयित बोलत होता कोकणी

Goa Tourism: 'जे गोव्यात परतले, त्‍यांचीही पर्यटक म्‍हणून नोंद'! लोबोंचा ‘घरचा आहेर’; पर्यटनमंत्र्यांनी दिला बदनामी न करण्याचा सल्ला

Goa GMC: 'गोमेकॉ'मध्ये आणताना 88 रुग्‍ण दगावले! विधानसभेत आरोग्‍यमंत्र्यांच्या उत्तरातून माहिती समोर

Goa Police: 'गोवा पोलिस सर्वात खराब, कोलवा बीचवर मला भीती दाखवून 2,000 लाच घेतली'; पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT