Hindu Temples Before Mosques | Babri Masjid Anniversary Dainik Gomantak
देश

Babri Masjid: केवळ बाबरीच नव्हे तर 'याठिकाणी' देखील मशिदींच्या आधी होती हिंदू मंदिरं, वाचा..

विविध आक्रमकांनी भारतावर आक्रमण करून येथील सांस्कृतिक आणि धार्मिक गोष्टींचा ऱ्हास केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Babri Masjid Anniversary: भारताला हजारो वर्षांचा  इतिहास आहे. ज्ञानाचे भांडार,निसर्गाने समृद्ध अश्या सर्वसंपन्न भारतावर आधीपासूनच परकीय आक्रमकांची नजर होती आणि कालानंतराने मोठ्या प्रमाणावर या आक्रमणांना सुरवात झाली. मंगोल, मुघल नंतर ब्रिटिश अश्या विविध आक्रमकांनी भारतावर आक्रमण करून येथील सांस्कृतिक आणि धार्मिक गोष्टींचा ऱ्हास करायला सुरुवात केली. त्यामध्ये सर्वात अग्रभागी होती हिंदू मंदिरे.

‘जर भारतात राज्य करायचे असेल तर भारतीयांच्या धार्मिक खुणा नष्ट कराव्या लागतील’ या विचाराने त्यांनी हिंदू मंदिर पाडून तिथे त्यांची धार्मिक स्थळे उभारण्यास सुरवात केली. प्रामुख्याने परकीय आक्रमक मुस्लिम असल्याने त्यांनी मंदिरे पाडून त्यावर मशिदी उभारल्या. इतिहासात जवळपास ३००० मंदिरे पाडून त्यावर दर्गा, मशिदी, घुमट बांधल्याचा अंदाज आहे. त्या अनेक मुस्लिम वास्तू आहेत जिथे आधी मंदिर अस्तित्वात होती.

1.काशी विश्वनाथ मंदिर- ग्यानवापी मशीद- काशी विश्वनाथ मंदिर हे हिंदू धर्मियांचे अत्यंत श्रद्धा असलेले धार्मिक स्थळ. भगवान शंकराचे हे मंदिर वाराणसी येथे आहे. गंगा स्नान करायला किंवा विश्वनाथाला नमन करायला प्रत्येक भारतीय मोठ्या श्रद्धेने येथे येतो. एवढंच नव्हे तर ही काशीनगरी भारतातील सर्वांत पुरातन नगरींमधील एक म्हणून देखील ओळखली जाते. मात्र आता ते पुरातन ज्योतिर्लिंग तिथे नाहीये. आता सध्या जे मंदिर तिथे अस्तित्वात आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले आहे.

2.श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर(मथुरा)- शाही ईदगाह मशिद - श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर किंवा श्रीकृष्णमंदिर हे भारतीयांचे श्रद्धास्थान मथुरेला आहे. ज्याप्रमाणे द्वारकाधीश मंदिर द्वारकेला आहे अगदी त्याचप्रमाणे हे मथुरेचे श्रीकृष्णमंदिर भगवान श्रीकृष्ण यांच्या नातवाने म्हणजे वज्र यांनी बांधले होते. मथुरेचे हे मंदिर प्रत्येक भारतीयांसाठी श्रद्धेचे स्थान आहे.आज त्याठिकाणी दिसणारी शाही इदगाह मशीद ही औरंगजेबाने १६६० च्या आसपास बांधली असल्याचा दावा आहे. बाजूचे मंदिर हे १९६५ साली प्रचंड वादानंतर बांधले गेले.

3. रुद्र महालय-जामी मशिद - गुजरातमधील रुद्र महालय हे शिवमंदिर सरस्वती नदीच्या खाडीलगत होते. या मंदिराच्या बांधणीला सुरवात इ.स पूर्व ९४३ मधेच सुरू झाली होती; १२व्या शतकात सिद्धराज जयसिंह यांनी या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. मात्र १४१०-१४४४ या काळात परकीय आक्रमक अलाउद्दीन खिलजीने या मंदिराची तोडफोड केली आणि तिथे जामी मशीद वसवली.

4. भद्रकाली मंदिर-जामा मशिद - तेव्हाच्या भद्र, राजनगर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि आताच्या अहमदाबाद असणाऱ्या भागात ही मशीद आहे.या मशिदीच्या जागेवर आधी भद्रकाली देवीचे मंदिर होते.आजही जामा मशिदीचे खांब आणि भिंती या विविध हिंदू देवदेवतांच्या चित्रांनी आणि कोरीव कामांनी भरलेल्या आहेत. एवढेच नाही तर ही मशिदभद्र किल्ल्याला लागूनही आहे म्हणजे तात्कालीक काळामध्ये त्या किल्ल्याचा काही भाग पाडून तिथे ही मशीद उभारण्यात आली असल्याचा दावा स्थानिक लोक करतात.

5. ध्रुव स्तंभ/विष्णू ध्वज -कुतुबमिनार- आजकाल आपण दिल्लीत ज्याला कुतुबमिनार म्हणतो तो कुतुबुद्दीन ऐबक याने बांधला असे काही जण मानतात..खरेतर राजा विक्रमादित्य याने बांधलेले “हिंदू नक्षत्र निरीक्षण केंद्र” आहे, ज्याचे खरे नाव “ध्रुव स्तंभ” आहे. पण प्राचीन इतिहासकारांनी मूर्खपणाने आणि आधुनिक काळात “मुस्लिम तुष्टीकरणासाठी” कुतुबमिनार कुतुबुद्दीन ऐबकने बांधला होता असे सांगतात.

6. राममंदिर अयोध्या-बाबरी मशिद- हिंदूंच्या मते, जमिनीवर १५२८ मध्ये बाबरी मशीद बांधली गेली ती ‘रामजन्मभूमी’ (श्री रामाचे जन्मस्थान) आहे. पण, मीर बाकी, एक मुघल राजा जो बाबरचा सेनापती होता तो असे म्हणतो की पूर्वीपासून असलेले सगळी मंदिर नष्ट केले आहे आणि बाबरी नावाची मशिद त्या जागेवर बांधली आहे (बाबरची मशीद).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT