Gujarat Exit Poll: गुजरातमध्ये मोदी करिष्मा कायम! सर्व रेकॉर्ड मोडण्यासाठी भाजप सज्ज

Gujarat Assembly Elections: गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला लागणार असून त्याआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत.
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Gujarat Assembly Elections: गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला लागणार असून त्याआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. दिल्ली विद्यापीठाचा पहिला एक्झिट पोल आला असून, त्यात गुजरातमध्ये भाजपला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सर्वेक्षणानुसार, राज्यातील 182 विधानसभा जागांपैकी भाजप 167 जागा जिंकू शकतो. इतकंच नाही तर त्यांना 54.5 टक्के मते मिळत असून, त्यांनी मतांच्या टक्केवारीचाही विक्रम मोडीत काढला आहे. त्याचवेळी, काँग्रेस मुख्य विरोधी पक्षाचा दर्जा गमावू शकते. त्याचबरोबर 15 टक्के मतांसह कॉंग्रेस (Congress) केवळ 4 जागा मिळवू शकते. गुजरातमध्ये विजयी प्रचार करणाऱ्या आम आदमी पक्षाला पहिल्याच प्रयत्नात 11 जागा मिळण्याची खात्री आहे.

PM Narendra Modi
Gujarat Election 2022: दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, पंतप्रधानांसह दिग्गज नेते बजावणार मतदानाचा अधिकार

सर्वेक्षणानुसार, आम आदमी पक्षाला 15.8 टक्के मते मिळतील, जी काँग्रेसपेक्षा थोडी जास्त आहेत. दुसरीकडे, अपक्षांचे खातेही उघडणार नाही. सर्वात मोठी आनंदाची बातमी फक्त गुजरातमधील भाजपसाठी (BJP) आहे, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम करु शकतो.

तसेच, काँग्रेसचे मुख्यमंत्री माधवसिंह सोळंकी यांनी यापूर्वी 1985 मध्ये 149 जागा जिंकण्याचा विक्रम केला होता. अशा प्रकारे भाजपला 149 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर हा मोठा विक्रम ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी निवडणूक प्रचारात अनेक वेळा पुनरुच्चार केला आहे की, यावेळी भाजप गुजरातमध्ये विक्रमी जागा जिंकेल.

PM Narendra Modi
Gujarat Elections: 'मला शिव्या देण्यासाठी रामायणातून रावण आणला...', PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

त्याचबरोबर, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 99 जागांवर अडकला होता. अशा स्थितीत त्यांच्यासाठी यावेळी 167 जागा मिळवणे महत्त्वाचे ठरणार आहे. एक्झिट पोलचे अंदाज खरे मानले तर गुजरातमधील मतांच्या विभाजनाचा थेट फायदा भाजपला झाल्याचे स्पष्ट होते.

शिवाय, आम आदमी पक्षाने काँग्रेसच्या खात्यात जाऊ शकणाऱ्या 30 टक्के मतांपैकी निम्मी मते घेतली आणि त्याचा भाजपला थेट फायदा झाला. 2017 च्या निवडणुकीतही भाजपने शहरी जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.

PM Narendra Modi
Gujarat Assembly Election: गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचार थांबला; 89 जागांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान

गुजरातमध्ये एक्झिट पोल कसा झाला

दिल्ली विद्यापीठाच्या सेंटर फॉर ग्लोबल स्टडीजने सांगितले की, हे सर्वेक्षण 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत करण्यात आले. यामध्ये सर्व 182 जागांसाठी 10721 मतदारांचे मत घेण्यात आले आहे. या निवडणूक सर्वेक्षणात दिल्ली विद्यापीठातील विविध विभाग आणि महाविद्यालयातील सुमारे 500 विद्यार्थी आणि संशोधन अभ्यासकांनी गुजरातमधील विविध विद्यापीठांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण केले. डॉ.महेश कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सर्वेक्षणकर्त्यांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून मतदानाच्या वर्तनाशी संबंधित डेटा संकलित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com