Narendra Modi: मोपासह तब्बल 1 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे मोदी गोव्यात करणार उद्घाटन

मोदी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथीशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.
Narendra Modi
Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी मोपा विमानतळाच्या उद्घाटनासाठी गोव्यात येत असून रविवारी ते आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथीशी संबंधित 1,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.  हे प्रकल्प गोवा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात आहेत. "आयुर्वेद कॉंग्रेसकडून, मोदी तीन प्रकल्पांचे उद्घाटन करतील," अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. याप्रसंगी केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल उपस्थित रहाणार आहेत.

या संस्थेत आयुर्वेदातील पदवीपूर्व (110 जागा) आणि पदव्युत्तर (56 जागा) अभ्यासक्रम सुरू होतील. तसेच तेथे संशोधन केंद्र असून 250 खाटांचे रुग्णालय देखील असणार आहे. 50 एकरांवर पसरलेल्या आणि 300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधलेल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार असल्याचे सावंत म्हणाले आहेत.

गाझियाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिनचेही मोदी उद्घाटन करणार आहेत. हा प्रकल्प 10 एकरांवर बांधलेला असून त्यासाठी 350 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दिल्लीतील राष्ट्रीय होमिओपॅथी संस्थेचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.

Narendra Modi
NITI Aayog: राहुल गांधींचा वायनाड मतदारसंघ ठरला अव्वल, 'या' मध्ये केले टॉप!

9 व्या आयुर्वेद काँग्रेसमध्ये मोदी सुमारे 5,000 प्रतिनिधींना संबोधित करतील. या कार्यक्रमासाठी 150 निमंत्रित वक्ते उपस्थित राहणार आहेत, 450 वैज्ञानिक शोधनिबंध सादर केले जातील, 600 शोधनिबंध प्रदर्शित केले जातील, आणि 200 कंपन्या सहभागी होतील. तसेच, काँग्रेसचे ४०० आयुर्वेद एक्स्पो स्टॉल आणि नऊ संबंधित कार्यक्रम असतील, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

Narendra Modi
ATM Rules: ATM मधून पैसे काढणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 'या' सरकारी बँकेच्या नियमात मोठा बदल

"गोव्याच्या दृष्टीने ही आणखी एक मोठी घटना आहे. भारतात शिकणारे 36 देशांतील विद्वान या काँग्रेसला उपस्थित राहतील. 8 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या चार दिवसीय संमेलनात आयुर्वेदाचे प्रमुख अभ्यासक एकत्र येणार असल्याचे" सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com