Viral Video Dainik Gomantak
देश

Video: त्यामुळेच मुलाने वडिलांच्या चितेवर दारु, पान आणि बिडी अर्पण केली; व्हिडिओ व्हायरल

Viral Video: वाराणसीमधून असा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे की, ते पाहून सगळेच जण हैराण झाले आहेत.

Manish Jadhav

Viral Video: वाराणसीमधून असा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे की, ते पाहून सगळेच जण हैराण झाले आहेत. इथे एका व्यक्तीने वडिलांच्या अंत्यसंस्कारावर केवळ दारुच नाही तर पान आणि बिडीही ठेवली. वडिलांच्या अंत्यसंस्काराचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याने असे का केले हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे.

यावर सोशल मीडिया (Social Media) यूजर्स विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. काहीजण त्यावर टीका करत आहेत तर काही जण कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ मणिकर्णिका घाटावरील आहे. त्या व्यक्तीला याबाबत विचारले असता त्याने सांगितले की, त्याच्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीच्यावेळी दारु वाहण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने असे केले. सामान्यतः असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या अंत्यसंस्कारात त्याने वापरलेल्या वस्तूच अर्पण केल्या जातात अशी प्रथा आहे.

व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, वडिलांना अखेरचा नमस्कार केल्यानंतर तो चितेवर दारु, बिडी आणि बनारसी पान अर्पण करत आहेत. यासोबतच हर हर महादेवाचा जयघोष केला जात आहे. हा अनोखा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत हा व्हिडिओ एक लाख वेळा पाहिला गेला आहे. याबाबत इंस्टाग्रामवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.

यूजर्स काय म्हणाले

इंस्टाग्रामवरील (Instagram) कमेंटमध्ये एका व्यक्तीने लिहिले की, मृत व्यक्तीची आवडती वस्तू त्याला दिली जाते आणि तेच केली जात आहे. दुसर्‍याने लिहिले काय प्रॉब्लेम? अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या कोणालाही हे माहित आहे की ही एक सामान्य प्रथा आहे. दुसर्‍या यूजरने लिहिले की होय, बरेच लोक असे करतात. 11व्या दिवशी पिंड दानानंतर मृत व्यक्तीच्या आवडत्या गोष्टी दिल्या जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT