Father's Day 2025 Dainik Gomantak
देश

'बाबा माझ्या भावासारखा दिसतो!' वामिकाने विराटसाठी लिहिली फादर्स डेची खास कविता; अनुष्काची गोड Post Viral

Anushka Sharma Post Viral: फादर्स डेच्या निमित्ताने वामिकाने वडील विराट कोहलीसाठी एक खास कविता लिहिली आहे, जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली

Akshata Chhatre

Vamika Poem for Virat: प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हे एक खास व्यक्तीमत्व असतात. वडिलांनी तिच्यासाठी घेतलेले कष्ट ती कधीच विसरत नाही. आईसोबत जसे सहज बोलणे होते, तसे बाबांसोबत होत नसले तरी, बाबा कायमच मुलीच्या मनात एक विशेष स्थान टिकवून असतात. त्यांच्या कुशीत मुलीला सर्वाधिक सुरक्षित वाटते.

अशीच काहीशी गोड भावना विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची लाडकी चिमुकली वामिका हिने आपल्या बाबांसाठी व्यक्त केली आहे. फादर्स डेच्या निमित्ताने वामिकाने वडील विराट कोहलीसाठी एक खास कविता लिहिली आहे, जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

अनुष्काने शेअर केला वामिकाचा 'खास' अनुभव

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने आज फादर्स डेच्या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधील छोट्याशा वामिकाच्या अक्षरातील कविता सध्या अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत आहे. ही कविता वामिकाने स्वतः लिहिलेली नसली तरी, ती कदाचित अनुष्काने वामिकाच्या मनातलं प्रेम आणि भावना व्यक्त करत लिहिली असावी, असा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत.

या कवितेत वामिका म्हणते, "बाबा माझ्या भावासारखा दिसतो, माझ्यासोबत मेकअप-मेकअप खेळतो, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि तो सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करतो."

या कवितेच्या शेवटी मात्र वामिकाने स्वतःच्या निरागस अक्षरात तिचं नाव लिहिलं आहे, ज्यामुळे विराट आणि मुलगी वामिका यांच्यातील वडील-मुलीचं गोड आणि घट्ट नातं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

ही पोस्ट पाहून चाहते खूपच भावुक झाले आहेत. एका प्रसिद्ध क्रिकेटपटूचा मुलीसोबतचा हा गोड क्षण पाहून, अनेक पालकांना आपल्या मुलांसोबतच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. ही कविता केवळ विराट-वामिकाचे नाते दर्शवत नाही, तर प्रत्येक बाप-मुलीच्या नात्यातील निरागसता आणि जिव्हाळा समोर आणते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT