Manish Jadhav
जेव्हा-जेव्हा विराट क्रिकेटच्या मैदानात उतरतो तेव्हा कोणता ना कोणता रेकॉर्ड त्याची वाट पाहतच असतो.
विराटच्या आरसीबीने आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले. इतकेच नाही तर संघ टॉप 2 मध्ये पोहोचला. इथपर्यंत संघाला पोहोचवण्यात विराटने महत्त्वाची भूमिका निभावली.
आयपीएल 2025 चा पहिला प्लेऑफचा सामना गुरुवारी (29 मे) आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे.
प्लेऑफच्या सामन्यात विराटला मोठा रेकॉर्ड करण्याची नामी संधी आहे. तो पंजाब किंग्जविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकतो. यासाठी त्याला फक्त काही धावांची आवश्यकता आहे.
जर विराटने पंजाबविरुद्धच्या सामन्यात 31 धावा केल्या तर तो कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नरला मागे सोडेल.
आयपीएलच्या इतिहासात केवळ दोनच असे फलंदाज आहेत, ज्यांनी पंजाबविरुद्ध 1100 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. इतर कोणताही फलंदाज 1000 धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही.
प्लेऑफच्या सामन्यात विराटने आपला जलवा दाखवावा अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.